Mon. Dec 6th, 2021

वांगणी- बदलापूर दरम्यान महालक्ष्मी एक्स्प्रेस अडकली, बचावकार्य सुरू

वांगणी- बदलापूर दरम्यान उल्हास नदीला पूर आल्यामुळे रेल्वे रुळावर पाणी आल आहे. त्यामुळे शुक्रवार मध्यरात्रीपासून कल्याणपासून पुढे मध्यरेल्वेची वाहतूक ठप्प आहे. नेमक्या याच वेळी कोल्हापूरला निघालेल्या महालक्ष्मी एक्सप्रेसच्या प्रवाशांना जोरदार फटका बसला आहे. वांगणी-बदलापूर या दोन स्टेशनमध्ये महालक्ष्मी एक्सप्रेस थांबली आहे. त्यामुळे गेल्या 12  तासापासून गाडीमधील प्रवाशी अडकले आहेत. दरम्यान या प्रवाशांची सुटका करण्यासाठी आरपीएफ आणि स्थानिक पोलीस, जिल्हाधिकारी घटनास्थळावर दाखल  झाले आहेत.  NDRF ची पथक पुणे, मुंबईहून निघाली आहेत. थोड्याच वेळात पोहोचणार आहेत. गाडीत अडकलेल्या प्रवाशांना बिस्कीट,पाणी वाटप केलं जात आहे. या प्रवाशांना सुरक्षित बाहेर काढण्याला प्रशासनाचं सर्वोच्च प्राधान्य आहे अस जिल्हाधिकाऱ्यांनी सांगीतलं आहेमहालक्ष्मी एक्सप्रेस खोळंबली

महालक्ष्मी एक्स्प्रेस अडकली,

गेल्या 12 तासापासून बदलापूर-वांगणीदरम्यान महालक्ष्मी एक्स्प्रेस अडकली

या ट्रेनमध्ये 1200 प्रवासी असून अडकलेल्या प्रवाशांना बिस्कीट,पाणी वाटप केलं जात आहे.
NDRF ची चार पथकं थोड्याच वेळात घटनास्थळी पोहोचणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
५० जणांच पथक, ६ बोटीच्या साहाय्याने बचावकार्य केलं जाणार आहे.
पुण्यातून 40 जणांची टीम 5 बोटीसह बचावकार्यासाठी रवाना झाले आहेत.
सध्या आरपीएफ,स्थानिक पोलिस, जिल्हाधिकारी घटनास्थळी पोहोचले आहेत.
या प्रवाशांना बिस्कीट, पाणी पोहोचवण्याचा प्रयत्न केला जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *