Mon. Oct 25th, 2021

महालक्ष्मी एक्सप्रेसचे नाव शिवसेनेने बदलले

जय महाराष्ट्र न्यूज, कोल्हापूर

 

अंबाबाई मंदिरातील वाद संपतो न संपतो तोच आता कोल्हापूरहून सुटणाऱ्या महालक्ष्मी एक्स्प्रेसच्या नावाचा वाद समोर आला आहे.

 

कोल्हापूरची अंबाबाई अशी देवीची ओळख असल्याने, महालक्ष्मी एक्स्प्रेसचंही नाव श्री अंबाबाई एक्स्प्रेस करावे अशी मागणी करत शिवसैनिकांनी थेट कोल्हापूर रेल्वे

स्थानकात उभ्या असलेल्या महालक्ष्मी एक्स्प्रेसवर श्री अंबाबाई एक्स्प्रेसचे फलक लावले.

 

आमदार राजेश क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली शिवसैनिकांनी मोठ्या संख्येने या आंदोलनात सहभाग नोंदवला. प्लॅटफॉर्मवर मोठ्या संख्येने जमलेल्या आंदोलकांना आवर

घालताना पोलिसांची मात्र चांगलीच कसरत झाली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *