Mon. Jul 22nd, 2019

#MaharanaPratapJayanti : महाराणा प्रतापांसंदर्भातील या गोष्टी माहीत आहेत का?

0Shares

आज मेवाडचे 13 वे राजपुत्र महाराणा प्रताप यांची 479 वी जयंती. आपल्या अभूतपूर्व पराक्रमाने मोंगलांशी लढणारे महाराणा प्रताप म्हणजे केवळ राजपुतांच्याच नव्हे, तर तमाम भारताच्या इतिहासातील एक महापराक्रमी आणि साहसी पुरूष म्हणून मानले जातात. महाराणा प्रताप यांच्याबद्दल ही माहिती तुम्हाला आहे का?

  • महाराणा प्रताप यांनी बलाढ्य अकबर बादशाहच्या सैन्याशी सलग 30 वर्षं संघर्ष केला.
  • महाराणा प्रताप आणि बादशाह अकबर यांच्यात 18 जून 1576 रोजी झालेलं हळदीघाटीचं युद्ध हे देशाच्या इतिहासातील एक महान ऐतिहासिक युद्ध मानलं जातं.
  • अकबराचं मोंगल सैन्य 1 लाखाच्या आसपास होतं, तर महाराणा प्रताप यांचं सैन्य जेमतेम 20,000 सैनिकांचं होतं.
    तरीही महाराणा प्रताप यांनी हार मानली नाही.

  • महाराणा प्रताप यांचा घोडा चेतक याने महाराणा प्रताप यांना युद्धात खूप साथ दिली. त्यांच्यासाठी मोठं बलिदानही दिलं. मोंगलांची सेना महाराणा प्रताप यांचा पाठलाग करत असताना आपल्या स्वामींचा शत्रूंपासून बचाव करण्यासाठी चेतकने 26 फुटांचा नाला एका उडीत पार केला. मोंगलांच्या सैन्याला मात्र असं करता आलं नाही. चेतकच्या बलिदानाला आजही राजस्थानी लोकगीतांमध्ये स्थान आहे.
  •  महाराणा प्रताप हे जरी राजे असले, तरी राजासारखं आयुष्य त्यांना जगता आलं नाही. जोपर्यंत चित्तोड पुन्हा मिळवत नाही, तोपर्यंत आपण पालापाचोळा खाऊ आणि जमिनीवरच झोपू अशी प्रतिज्ञा त्यांनी केली होती. ती प्रतिज्ञा त्यांनी शेवटच्या श्वासापर्यंत पाळली.
  • ज्यावेळी महाराणा प्रताप यांचा मृत्यू झाला, तेव्हा त्यांचा शत्रू असणारा अकबर बादशाहदेखील हळहळला होता.
0Shares

Leave a Reply

%d bloggers like this: