Wed. Dec 1st, 2021

राज्यातील सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या

राज्य सरकारकडून सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. राज्य सरकारने आज २२ सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. 

मेट्रो वूमन अशी ओळख असलेल्या आश्विनी भिडे यांची बदली करण्यात आली आहे. भिडे यांची मेट्रो व्यावस्थापकीय संचालक पदावरुन बदली करण्यात आली आहे.

आश्विनी भिडे यांच्या जागी रणजित सिंह देओल यांच्याकडे मेट्रो व्यावस्थापकीय संचालका पदाची जबाबदारी देण्यात आली आहे. तर आश्विनी भिडेंकडे तूर्तास कोणतीही जबाबदार देण्यात आलेली नाही.

तर कर्तव्यदक्ष अधिकारी अशी ओळख असलेल्या तुकाराम मुंढेची बदली केलेली आहे. तुकाराम मुंढेची नागपूर महानगरपालिकेच्या आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे.

तुकाराम मुंढेची एड्स नियंत्रण प्रकल्पाच्या संचालकपदावरुन मुंढेंची बदली करण्यात आली आहे. प्राजक्त वर्मा यांची मराठी भाषा विभागाच्या सचिवपदी बदली केली आहे. उत्पादन शुल्क विभागाच्या आयुक्तपदावरुन वर्मा यांची बदली करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *