जिल्हा परिषद निवडणूक : राज्यातील निकाल एका क्लिकवर

राज्यात महाविकासआघाडीचं सरकार स्थापन झालं आहे. यानंतर लगेचच राज्यात ६ जिल्हा परिषदांसाठी निवडणुका झाल्या.

नागपूर, वाशिम, अकोला, धुळे, नंदूरबार आणि पालघर या ६ जिल्हा परिषदांसाठी निवडणुका झाल्या. या निवडणुकांचे कल जवळपास आले आहेत.

धुळे जिल्हा परिषदेचा अपवाद वगळता इतर पाचही जिल्हा परिषदेत महाविकासआघाडीने घवघवीत यश संपादन केलं आहे.

धुळ्यात जरी भाजपला एकहाती सत्ता मिळाली आहे. तरी सुद्धा भाजपला आपला गड गमवावा लागला आहे. नागपुरचा गड भाजपच्या हातातून निसटला आहे.

पालघर जिल्हा परिषद : ५७ जागा

पालघर जिल्हा परिषदेत महाविकासआघाडीने मुसंडी मारली आहे. पालघरमध्ये शिवसेना मोठा पक्ष ठरला आहे. तर मनसेला खातं देखील उघडता आलेलं नाही.

पालघर जिल्हा परिषदेतील पक्षनिहाय जिंकलेल्या जागा

शिवसेना : १८
राष्ट्रवादी : १५
भाजप : १०
माकप : ६
बविआ : ४
अपक्ष : ३
काँग्रेस : १
मनसे : ०

अकोला जिल्हा परिषद निकाल : ५३ जागा

अकोला जिल्हा परिषदेत भारिप सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. भारिपला सर्वाधिक म्हणजेच १९ जागा मिळाल्या आहेत.

शिवसेना : १८
भारिप : १९
भाजप : ५
राष्ट्रवादी : ३
काँग्रेस : ३
अपक्ष : ४

नागपूर जिल्हा परिषद निकाल : ५८ जागा

भाजपला आपला गड राखण्यास अपयश आले आहे. महाविकासआघाडीने भाजपच्या गडाला सुरंग लावला आहे.

काँग्रेस : ३०
भाजप : १५
राष्ट्रवादी : १०
शेकाप : ०१
शिवसेना : ०१
अपक्ष : ०१

धुळे जिल्हा परिषद निकाल : ५५

धुळे जिल्हा परिषदेत भाजपला यश आले आहे. धुळ्यात भाजपचा ३८ जागांवर विजय झाला आहे.

धुळ्यात राष्ट्रवादीला भोपळा देखील फोडता आलेला नाही. तर एक निकाल राखून ठेवण्यात आला आहे.

भाजप : ३९
काँग्रेस : ७
शिवसेना : ४
राष्ट्रवादी काँग्रेस : ३
अपक्ष : ३

नंदुरबार जिल्हा परिषद निकाल : ५६

नंदुरबार जिल्हा परिषदेत काँग्रस आणि भाजपचे समसमान उमेदवार विजयी झाले आहेत.

काँग्रेस : २३
भाजपा : २३
शिवसेना : ७
राष्ट्रवादी : ३

वाशिम जिल्हा परिषदेतील पक्षनिहाय जागा

शिवसेना : 6
भाजप : 7
वंबआ : 8
राष्ट्रवादी : 12
काँग्रेस : 9
अपक्ष : 3
जनविकास आघाडी : 6
स्वाभिमानी : 1

Exit mobile version