Mon. Oct 18th, 2021

राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आजपासून सुरुवात

राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आजपासून (२४ फेब्रुवारी) सुरुवात होत आहे. महाविकासआघाडी सरकारचा हा पहिलाच अर्थसंकल्पीय अधिवेशन असणार आहे.

हे अधिवेशन संपूर्ण महिन्याभर असणार आहे. एकूण १८ दिवस कामकाज चालणार आहे.

या अधिवेशनादरम्यान ६ मार्चला २०२०-२१ या आर्थिक वर्षाचे अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे.

या अधिवेशनात विरोधकांनी सरकारला कोंडण्याची तयारी केली आहे. महिला सुरक्षा,शेतकरी कर्जमाफी यासारख्या मुद्दयांवरुन विरोधक सरकारला कोंडीत धरणार आहेत..

दरम्यान विधानसभेत सकाळी ११ वाजता तर विधानपरिषदेत १२ वाजता पासून कामकाजाला सुरुवात होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *