पर्यावरण मंत्र्यांचं ‘ते’ स्वप्न अखेर पूर्ण

पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांचं बहुप्रतिक्षित स्वप्न पूर्ण झालं आहे. ७ वर्षापासून प्रतिक्षेत असलेल्या मुंबईतील नाईट लाईफ सुरु करण्याच्या निर्णयाला राज्य मंत्रिमंडळाने आज मान्यता दिली आहे.

२७ जानेवारीपासून नाईट लाईफच्या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. या निर्णायामुळे मुंबई २४ तास सुरु राहणार आहे.

या भागात नाईट लाईफ

नाईट लाईफ निर्णयाची अंमलबजावणी मुंबईतील काही निवडक ठिकाणीच करण्यात येणार आहे. मानवी वस्ती नसलेल्या वस्तीमध्येच या निर्णयाची अंमलबजावणी केली जाणार आहे.

यामध्ये काळा घोडा, नरिमन पॉईंट आणि वांद्रे-कुर्ला संकुल (BKC) या ठिकाणी मुंबईकरांना नाईट लाईफचा आनंद घेता येणार आहे.

याभागातील हॉटेल्स, मॉल आणि दुकाने २४ तास सुरु ठेवण्यासाठीची परवानगी देण्यात आली आहे.

काय म्हणाले आदित्य ठाकरे ?

रोजगार निर्मिती आणि महसूल वाढवण्याबरोबरच जनतेला २४ तास सेवा मिळावी, हे या निर्णयामागील मूळ उद्देश असल्याची माहिती उद्धव ठाकरे यांनी दिली.

आदित्य ठाकरेंनी पत्रकार परिषद घेऊन नाईट लाईफ बद्दल माहिती दिली.

पब आणि बार हे केवळ रात्री दीड वाजेपर्यंतच सुरु राहणार आहेत. या पब आणि बारसाठी काही नियम आहेत. त्यात बदल केला गेला नसल्याची माहिती आदित्य ठाकरेंनी दिली.

नाईट लाईफमुळे पोलिसांवर ताण येईल, असे विरोधकांकडून सातत्याने म्हटलं जात आहे. विरोधकांच्या या मुद्द्यावर आदित्य ठाकरेंनी प्रतिक्रिया दिली.

नाईट लाईफमुळे पोलिसांवर कोणताही परिणाम होणार नाही.

रात्री सुरु असलेल्या दुकानांच्या संरक्षणाचीसाठीची सुरक्षा मालकांना घेण्यास सांगितली आहे.

त्यामुळं पोलिसांवर कुठल्याही प्रकारे ताण येणार नसल्याचं आदित्य म्हणाले.

दुकान मालकांना सुरक्षा हवी असल्यास योग्य मोबदला देऊन पोलिसांची सुरक्षा घेऊ शकतात, असेही आदित्य ठाकरे म्हणाले.

दरम्यान विरोधकांकडून नाईट लाईफ अंमलबजावणीच्या निर्णयाचा विरोध केला जात आहे.

Exit mobile version