राज्यात मोठ्या उत्साहात प्रजासत्ताक दिन साजरा

राज्यासह देशभरात मोठ्या उत्साहात प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला आहे.
राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील पालकमंत्र्यांनी ध्वजारोहण केलं आहे.
औरंगबाद
औरंगाबादेत पोलीस आयुक्त कार्यालयाच्या मैदानावर पालकमंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळेस एसआरपीएफ, औरंगाबाद पोलीस आणि एनसीसीच्या विद्यार्थ्यांनी पथसंचलन केले.

तसेच या वेळेस पालकमंत्र्यांनी विशेष कामगिरी केलेल्या पोलिस अधिकाऱ्यांना पुरस्कार देऊन गौरवले.
नांदेड
नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी नांदेडमध्ये पोलीस ग्राऊंडमध्ये ध्वजारोहण केलं.

यावेळी खालसा माध्यमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी तलवारबाजीचं प्रात्यक्षिकं केली
सातारा
साताऱ्यात शाहु स्टेडियममध्ये पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी धव्जारोहण केलं. यावेळी साताऱ्यातील काही शाळांमधील विद्यार्थ्यांनी संचलन केले. तसेच सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आले.
चंद्रपूर
जिल्ह्यातील मुख्य शासकीय ध्वजारोहण पालकमंत्री विजय वड्डेटीवार यांच्या हस्ते पार पडलं.

यावेळेस वड्डेटीवार यांनी शांतीचं प्रतिक म्हणून पांढरे फुगे हवेत सोडले. तसेच देशवासियांना शुभेच्छा दिल्या.
पुणे
राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी शिवाजीनगर पोलीस मुख्यालयात ध्वजारोहण केलं.
यावेळेस विशेष कामगिरी केलेल्या पोलिसांचा सन्मान अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आला.
बीड
सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी बीडमधील पोलीस मुख्यालयात पालकमंत्री म्हणून ध्वजारोहण केलं.

यावेळेस मुडें यांनी विविध योजना सुरु करणार असल्याची माहिती दिली.
नागपूर
नागपुरच्या कस्तुरचंद पार्कवर पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांच्या हस्ते झेंडावंदन करण्यात आले.
जिल्ह्यात जनस्वास्थ योजना सुरु करणार असल्याची माहिती पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी दिली.
नाशिक
अन्न नागरी पुरवठा मंत्री आणि नाशिकचे पालकमंत्री यांच्या हस्ते ध्वजारोहण केले गेले.
पोलीस कवायत मैदानावर हा कार्यक्रम पार पडला.
कोल्हापूर
कोल्हापुरात शाहू स्टेडियमवर ध्वजारोहणाचा कार्यक्रम पार पडला.

पालकमंत्री सतेज पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण सोहळा संपन्न झाला.