Fri. May 20th, 2022

Health Minister Live : आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची पत्रकार परिषद

ख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काही क्षणापूर्वी राज्यातील जनतेसोबत फेसबुक लाईव्हद्वारे संवाद साधला. यानंतर आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी पत्रकार परिषद सुरु आहे. या पत्रकार परिषदेत कोरोना संदर्भात अनेक प्रश्नांची उत्तर तसेच माहिती देत आहेत.

एसटी बसमध्ये २५ प्रवाशांनाच प्रवेश देणार. तसेच त्यांची आसनव्यवस्था देखील वेगळ्याप्रकारे असणार, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.

राजेश टोपे यांच्या पत्रकार परिषदेतील मुद्दे

रेल्वेमध्ये उभं राहून प्रवास बंद करण्याचा विचार

लोकल बंद करणं हा शेवटचा उपाय

विलगीकरण करण्यावर भर देणार

नागपूर, पुणे, मुंबईत विमानतळावर कडक योजना

एकूण १२ देशातील फ्लाईटवर पूर्णपणे बंदी

जनहित महत्वाचं, लोकांचं आरोग्य महत्वाचं

कोरोनाचे २ रुग्ण व्हेंटिलेटरवर

सध्या महाराष्ट्रात असलेल्या कोरोना हा लेव्हल-२ वर आहे. महाराष्ट्र हे भारतातलं कोरोनाग्रस्त रुग्णांची सर्वाधिक संख्या असलेलं राज्य आहे.

आतापर्यंत महाराष्ट्रातील कोरोनाग्रस्त रुग्णांचा आकडा हा ४९वर पोहचला आहे. या ४९ रुग्णांपैकी ४० रुग्णांनी परदेशातून आल्यानंतर कोरोनाची लागण झाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.