Fri. Sep 24th, 2021

मनसेचा आज 14 वा वर्धापन दिन

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा आज सोमवार 9 मार्च रोजी 14 वा वर्धापन दिन आहे. मनसेचा हा 14 वर्धापन दिन नवी मुंबईतील विष्णूदास भावे सभागृहात हा कार्यक्रम पार पडणार आहे.

मनसेचा वर्धापन दिन मुंबईबाहेर घेण्याची ही पहिलीच वेळ आहे. या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात राज ठाकरे आपल्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत.

तसेच राज ठाकरे काय बोलतात, याकडे सर्वांचेच लक्ष असणार आहे.

या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमादरम्यान मनसेच्या शॅडो कॅबिनेटची घोषणा करण्यात येणार आहे. मनसेच्या 23 जानेवारीला झालेल्या महाअधिवेशनात शॅडो कॅबिनेट स्थापन निर्माण करणार असल्याची घोषणा स्वत: राज ठाकरे यांनी केली होती.

मनसेच्या शॅडो कॅबिनेटची संभावित यादीमध्ये मर्जीतल्या नेत्यांना आणि पदाधिकाऱ्यांना स्थान दिल्याचं म्हटलं जात आहे.

महाविकासआघाडीच्या मंत्र्यांच्या कामावर खातेनिहाय लक्ष ठेवण्यासाठी या शॅडो कॅबिनेटची स्थापन करण्यात आली आहे.

शॅडो कॅबिनेटमध्ये कशाप्रकारे काम काम करावं, याचं प्रशिक्षण देणार असल्याची माहिती मिळत आहे.

शॅडो कॅबिनेट म्हणजे काय ?

महाविकासआघाडीच्या प्रत्येक मंत्र्याच्या कारभारावर लक्ष ठेवण्यासाठी विरोधी पक्षाकडून काही जणांची नेमणूक केली जाते. या प्रकाराला शॅडो कॅबिनेट म्हटलं जातं.

असं आहे खातेनिहाय संभावित शॅडो कॅबिनेट

बाळा नांदगावकर, गृहमंत्री

संदीप देशपांडे, नगरविकास

नितीन सरदेसाई, अर्थ

राजू उबरकर, कृषी

रिटा गुप्ता, महिला बाल कल्याण

किशोर शिंदे, कायदा सुव्यवस्था

अमेय खोपकर, सांस्कृतिक मंत्री

अभिजित पानसे, शालेय शिक्षण

गजानन काळे, कामगार

योगेश परुळेकर, सार्वजनिक बांधकाम मंत्री

दरम्यान मनसेच्या वर्धापन दिनानिमित्ताने मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी एक व्हिडिओ ट्विट केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *