Tue. Dec 7th, 2021

महिलेशी गैरवर्तन केल्यास फाडकन भडकावली पाहीजे – मनसे

हिंगणघाट जळीतकांड प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर मनसे आक्रमक झाली आहे. याबद्दल मनसेच्या अधिकृत ट्विटर खात्यावरुन ट्विट केलं आहे. राज्यात महिला अत्याचाराच्या बातम्या पाहून केवळ हळहल व्यक्त करुन चालणार नाही, असं ट्विट करण्यात आलं आहे.

काय म्हटलंय ट्विटमध्ये ?

राज्यात महिलांवरील अत्याचाराच्या बातम्या पाहून हळहगळ व्यक्त करुन चालणार नाही.

जिथं नराधमांकडून अन्याय-अत्याचार दिसतील, तिथे कशाचीही तमा न बाळगता प्रतिकारासाठी धावून गेलंच पाहिजे, असं या ट्विटमध्ये म्हटलं आहे.

तसेच “महिलांबद्दल जितका आदर तुम्ही अंत:करणामध्ये साठवित जाल, तितका तो शिवराया तुमच्यावर फार प्रसन्न होईल! महिलेशी कुणी गैरवर्तन केलं तर एक फाऽडकन भडकावली पाहीजे, असंही या ट्वविटमध्ये म्हटलं आहे.

दरम्यान मनसेने या ट्विटसोबत प्रबोधनकार ठाकरे यांच्या आवाजातला व्हिडिओ शेअर केला आहे.

हिंगणघाट जळीत कांडातील पीडिता अनंतात विलीन झाली आहे. अत्यंत शोकाकूल वातावरणात पीडितेवर अंत्यसंस्कार करण्यात आले. पीडितेच्या वडिलांनी मुखाअग्नी दिला.

या पीडितेची मृत्यूसोबतची ७ दिवसांची झुंज अपयशी ठरली. सोमवारी सकाळी ६ वाजून ५५ मिनिटांनी पीडितेने अखेरचा श्वास घेतला. ऑरेंज सिटी रुग्णालयातील डॉक्टरांनी सकाळी साडे सात वाजता मेडिकल बुलेटिनद्वारे पीडितेचा मृत्यू झाल्याची माहिती दिली.

दरम्यान पीडितेच्या भावाला शासकीय नोकरी देणार असल्याचं आश्वासन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिलं आहे. याबद्दल त्यांनी एक ट्विट केलं आहे.

तसेच पीडितेच्या कुटुंबियांच्या पाठीशी राज्य सरकार असल्याचंही या ट्विटमध्ये म्हटलं आहे.

हिंगणघाट येथील पीडिता अनंतात विलीन

हिंगणघाट प्रकरण : अपराध्याला शिक्षा दिल्याशिवाय सरकार शांत बसणार नाही – मुख्यमंत्री

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *