Wed. Oct 27th, 2021

Delhi Election Result 2020 : भाजपचा बुडबुडा आता फुटला आहे – जयंत पाटील

दिल्ली विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाचा विजय झाला आहे. दिल्लीत या विजयासह आपने विजयाची हॅट्रिक पूर्ण केली आहे. या निवडणुकीत भाजपचे अवघ्या काही उमेदवारांचाच विजय झाला आहे.

दरम्यान मंत्री जयंत पाटील यांनी दिल्ली निकालांच्या निमित्ताने भाजपवर टीका केली आहे.

काय म्हणाले जयंत पाटील ?

या दिल्ली विधानसभा निवडणुकींच्या माध्यमातून भाजपचा बुडबुडा  फुटला आहे. भाजपप्रती असलेला विरोध दिल्लीकरांनी मतदानातून प्रकट केला आहे. भाजपच्या लोकप्रियतेची लाट ओसरल्याच मंत्री जयंत पाटील म्हणाले आहेत. त्यांनी याबद्दल एक ट्विट केलं आहे.

केजरीवाल दिल्लीचा विकास करताना भाजप अडथळे निर्माण करत होती, असा आरोप जयंत पाटील यांनी केला आहे. तसेच यासर्व परिस्थितीचा दिल्लीकरांनी समाचार घेतला.

केजरीवाल यांच्या बाजूने लोकांनी मतदान केले यातच नरेंद्र मोदी यांचा पराभव झाल्याचं जयंत पाटील म्हणाले.

दिल्लीत आम आदमी पार्टीला ६३ तर भाजपचा ७ जागांवर विजय झाला आहे. दरम्यान काँग्रेसला यंदाही भोपळा फोडण्यास अपयश आले आहे.

Delhi Election Result : दिल्लीत आपची सत्तेची हॅट्रिक

Delhi Election Result 2020 : दिल्लीत काँग्रेसच्या ‘हाती’ भोपळाच

Delhi Election Result 2020 : ‘रिंकीया के पापा’ गाण्यावर नाचत साजरा केला विजय

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *