राज्य सरकारचा मोठा निर्णय

राज्य सरकारची आज बुधवारी मंत्रिमंडळ बैठक पार पडली. या बैठकीत अनेक महत्वाचे निर्णय घेण्यात आले. या बैठकीत शालेय विद्यार्थ्यांसाठी एक महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.
काय आहे निर्णय ?
राज्यातील शासकीय आणि अनुदानित शाळेतील विद्यार्थ्यांना मोफत चश्मा दिला जाणार आहे.
विद्यार्थ्यांमधील दृष्टीदोषचं निवारण करण्यासाठी मोफत चष्मा देण्याचा निर्णय घेतला गेला.
या निर्णयाला बैठकीत मान्यता देण्यात आली. ६ ते १८ या वयोगटातील विद्यार्थ्यांना मोफत चष्मा दिला जाणार आहे.
या योजनेसाठी २० कोटी रुपये अनावर्ती आणि ५ कोटी रुपये इतका आवर्ती खर्च अपेक्षित आहे.