Fri. Jan 28th, 2022

दरवर्षीप्रमाणे यंदाही दहावीच्या निकालात मुलींची बाजी

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या प्रादुर्भावामुळे राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या इयत्ता दहावीच्या परीक्षा होऊ शकल्या नसल्या तरी विद्यार्थ्यांच्या अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे तयार करण्यात आलेला निकाल आज दुपारी एक वाजता ऑनलाइन जाहीर करण्यात आला आहे. दरम्यान, शिक्षण मंडळाने पत्रकार परिषदेत राज्यातल्या निकालाची आकडेवारी जाहीर केली आहे.

राज्यात दरवर्षीप्रमाणे यंदाही मुलांपेक्षा मुलीच वरचढ ठरल्या आहेत. यंदाच्या वर्षी विद्यार्थिनींचा निकाल ९९.९६ टक्के लागला असून विद्यार्थ्यांचा निकाल ९९.९४ टक्के लागला आहे, तर दिव्यांग विद्यार्थ्यांनीही उत्तम कामगिरी केली असून त्यांचा निकाल ९७.८४ टक्के लागला आहे. तसेच खासगी विद्यार्थी म्हणून नोंदणी केलेल्यांची संख्या २८ हजार ४२४ असून त्यांचा निकाल ९७.४५ टक्के लागला आहे

यंदा दहावीच्या निकालात कोकण विभागाने बाजी मारली आहे. कोकणाचा निकाल सर्वाधिक म्हणजे १०० टक्के लागला आहे. तर सर्वात कमी निकाल हा नागपूर विभागाचा लागला आहे.

राज्यातल्या एकूण २२ हजार ७६७ शाळांपैकी २२ हजार ३८४ शाळांचा निकाल १०० टक्के लागला आहे. मार्च २०२० च्या निकालाच्या तुलनेत हा निकाल ४. ६५ टक्क्यांनी जास्त असल्याची माहिती राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष दिनकर पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.

 

यंदाच्या निकालाची वैशिष्ट्ये:

– राज्याचा निकाल ९९.९५ टक्के

– नऊ विभागीय मंडळाने घेतली परिक्षा

-कोकण विभागात १०० विद्यार्थी उत्तीर्ण

– सर्वांत कमी निकाल ९९.८४ नागपूर विभाग

-मुलींची बाजी- ९९.९६ टक्के मुली उत्तीर्ण

– ९९.९४ टक्के मुले उत्तीर्ण

विभागीय निकाल:

  • पुणे ९९.९६
  • नागपूर ९९.८४
  • औरंगाबाद ९९.९६
  • मुंबई ९९.९६
  • कोल्हापूर ९९.९२
  • अमरावती ९९.९८
  • नाशिक ९९.९६
  • लातूर ९९.९६
  • कोकण १००

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *