Tue. Dec 7th, 2021

अकोल्यात मुसळधार पावसामुळे नागरिकांच्या घरात पाणी

अकोला शहरामध्ये जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यामुळे अकोला महानगरांमध्ये खडकी सिंधी कॅम्प खोलेश्वर उमरी जुने शहर रणपिसे नगर हरिहर पेठ या भागात अनेक घरांमध्ये पावसाचे पाणी गेल्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. अकोल्याच्या इतिहासात तीन तासात मोठ्या प्रमाणात पाऊस आल्यामुळे आणि रात्रीची वेळ असताना नागरिकांची तारांबळ उडाली आहे.

दरम्यान नागरिकांच्या घरात २ ते ३ फूट पाणी होते,त्यामुळे या परिसरातील नागरिकांना रात्र जागून काढावी लागली आहे.तर उमरी या परिसरात पाणीच पाणी असून शहराच्या मधोमध वाहणारी मोरणा नदी दुतढि भरून वाहत असून जिल्हा प्रशासनसकडून नदी काठाच्या घरांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *