Thu. Dec 2nd, 2021

‘मनविसे अध्यक्षपद माझ्याकडे आलं तर मी स्विकारेन’

नाशिक: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते अमित ठाकरे नाशिकमध्ये असून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अमित ठाकरे यांना तातडीनं नाशिकला बोलावल्याची माहिती मिळत आहे. तसेच लवकरच अमित ठाकरेंवर मोठी जबाबदारी सोपवणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

दरम्यान, ‘राज ठाकरे देतील ती जबाबदारी पार पाडायला तयार आहे, अशा शब्दांत मनसे नेते अमित ठाकरे यांनी नव्या जबाबदारीचे संकेत दिले आहेत. मनविसेचे अध्यक्ष आदित्य शिरोडकर यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर मनविसेच्या अध्यक्षपदाची धुरा अमित ठाकरेंवर दिली जाणार असल्याची चर्चा आहे. त्यावर अमित ठाकरेंनी नाशिकमध्ये सूचक वक्तव्य केलं.

‘मनसे हा पक्ष राज ठाकरेंच्या जीवावर आणि नावावर चालतो. कुणी गेल्यानं काही फरक पडत नाही’, असं संदीप देशपांडे यांनी म्हटलं आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष आदित्य शिरोडकर यांनी शिवसेनेत प्रवेश केला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिरोडकर यांच्या मनगटावर शिवबंधन बांधून त्यांचं स्वागत केलं. त्यानंतर आता शिरोडकर यांच्याकडे असलेली जबाबदारी अमित ठाकरेंना मिळणार असल्याची चर्चा आहे. मात्र अजूनपर्यंत अध्यक्षपदाबाबत निर्णय झाला नसून साहेब जी जबाबदारी देतील ती घ्यायला तयार असल्याचं अमित ठाकरे यांनी म्हटलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *