Wed. Jun 26th, 2019

विधानसभेपाठोपाठ विधानपरिषदेत मराठा आरक्षण विधेयक मंजूर

0Shares

मराठा समाजासाठी स्वतंत्र प्रवर्ग तयार करून 16 टक्के आरक्षणाची तरतूद करणारे विधेयक राज्य विधिमंडळात आज म्हणजेच गुरुवारी सादर झाले. यापूर्वी राज्य मागासवर्ग आयोगाच्या अहवालावरील कृती अहवाल विधानसभेत सादर करण्यात आले होते. कृती अहवाल सादर केल्यानंतर विधानसभेतील सदस्यांनी अहवाल वाचनासाठी काही वेळ द्या, अशी विनंती करण्यात आली. यानुसार बहुचर्चित मराठा आरक्षण विधेयक विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात सादर करण्यात आले आहे. यावेळी दोन्ही सभागृहात एकमताने मराठाआरक्षण विधेयकाला मंजुरी देण्यात आली. त्यानंतर, सभागृहात सर्वपक्षीय आमदारांचा एकच जल्लोष पाहायला मिळाला.

या विधेयकात मराठा समाजाला 16 टक्के आरक्षण देण्यात आलं आहे. तर, मराठा समाजाचा SEBC प्रवर्गात समावेश करण्यात आला आहे.

कृती अहवाल सादर केल्यानंतर धनगर आरक्षणाचा मुद्दाही उपस्थित करण्यात आला. धनगर आरक्षणासंदर्भातही उपसमिती नेमली जाईल आणि त्यानंतर एटीआर सादर करुन धनगर आरक्षणाचा मुद्दा निकाली काढला जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे. अहवालात ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का लावण्यात आलेला नाही. मराठा समाजाला 16 टक्के आरक्षण देण्याची तरतूद योग्य ठरेल, असे या कृती अहवालात म्हटले आहे.

काय आहेत मराठा कृती अहवालामधील शिफारसी? 

  • मराठ्यांना 16 टक्के आरक्षणाची तरतूद
  • शिक्षण आणि नोकरीत आरक्षण
  • राजकीय आरक्षण नाही
  • 50 टक्क्यांच्या आरक्षणाची कमाल मर्यादा वाढवून देण्याची शिफारस
  • मराठा वर्ग सामाजिक आणि शैक्षणिकदृष्या मागासवर्ग म्हणून घोषित
  • मराठा वर्गाला संविधानात तरतूद केलेल्या आरक्षणाचे लाभ आणि फायदे मिळणार
  • अल्पसंख्यांक शैक्षणिक संस्था वगळता इतर शैक्षणिक संस्थांमधील प्रवेशामध्ये आरक्षण
  • खासगी शैक्षणिक संस्थांमध्ये (अनुदानप्राप्त किंवा अनुदान नसलेल्या) आरक्षणाची तरतूद
  • सरळ सेवा भरतीमध्ये आरक्षणाची तरतूद

0Shares

Leave a Reply

%d bloggers like this: