Tue. Dec 7th, 2021

‘कितीही स्ट्रॅटेजी करा,यापुढेही मोदीच पंतप्रधानपदी राहतील’

रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. त्या दोघांमध्ये तब्बल साडेतीन तास चर्चा झाल्याने अनेक तर्कवितर्क लढवले जात असताना राज्याचे विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत वक्तव्य केलं आहे.

‘कोणी कोणाला भेटावं यासंदर्भात प्रत्येकाला स्वातंत्र्य आहे. मात्र कोणी कितीही स्ट्रॅटेजी तयार केली, तरी २०२४ च्या निवडणुकीनंतर नरेंद्र मोदी यांच्याच नेतृत्वात सरकार स्थापन होईल’ , असं विरोधी पक्षनेते देवेद्र फडणवीस यांनी म्हटलंय. प्रशांत किशोऱ आणि शरद पवार यांच्या भेटीवर त्यांनी हे सुचक व्यक्त केलंय.

दरम्यान, भाजप नेते अतुल भातखळकर यांनी ट्विट करून शरद पवारांवर खोचक टीका केली आहे. ‘२०२४ नंतरही ते भावी पंतप्रधानच असतील…’, असं ट्विट अतुल भातखळकर यांनी केलं आहे. या ट्विटच्या माध्यमातून त्यांनी पवारांवर अप्रत्यक्षपणे टीका केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *