Mon. Dec 6th, 2021

महाराष्ट्र आज ओबीसी आंदोलनाने ढवळणार

महाविकास आघाडी सरकारने ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण संपुष्टात आणले, असा आरोप भाजपने केला असून याचा निषेध म्हणून आज भाजपच्या वतीने चक्का जाम आंदोलन करण्यात येणार आहे. राज्यातील सर्व ठिकाणी हे आंदोलन करण्यात येणार आहे.

राज्य सरकारकडून पुरेसे पुरावे आणि बाजू न मांडता आल्याने आरक्षण हातातून गेलं असल्याचा आरोप भाजपने केला आहे. वेळकाढूपणा काढणाऱ्या सरकारला जाब विचारण्यासाठी आज भाजप राज्यव्यापी आंदोलन करणार असल्याचं भाजपकडून सांगण्यात आलं आहे.

महाविकास आघाडी सरकारच्या चुकांमुळे सर्वोच्च न्यायालयाकडून ओबीसींचे राजकीय आरक्षण रद्द झाले, याचा निषेध करण्यासाठी आणि हे आरक्षण पुन्हा मिळण्यासाठी किमान एक हजार ठिकाणी चक्का जाम आंदोलन करणार असून पक्षाच्या प्रमुख नेत्यांसह एक लाख कार्यकर्ते अटक करून घेणार आहेत, असं भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.

‘विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस नागपूर येथे, तर मी स्वतः कोल्हापूर येथील आंदोलनात सहभागी होणार आहे. तसेच भाजप केंद्रीय सचिव पंकजा मुंडे पुणे येथील आंदोलनात सहभागी होतील’, अशी माहिती चंद्रकांत पाटील यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *