Mon. Dec 6th, 2021

चंद्रकांत पाटील यांना ‘राज’ योग

नाशिक: मनसे अध्यक्ष राज ठाकरे सध्या नाशिक दौऱ्यावर आहेत. ‘आमच्या वेळा जुळल्या तर राज यांच्यासोबत एक कप चहा घ्यायला काहीच हरकत नाही, असं वक्तव्य भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शनिवारी केलं होतं. मात्र आजच चंद्रकांत पाटील आणि राज ठाकरे यांची भेट झाली. एवढेच नव्हे तर चंद्रकांत पाटील आणि राज यांच्यात १५ मिनिटे चर्चाही झाली.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे दोघेही नेते तीन दिवसांपूर्वी नाशिकमध्ये दाखल झाले होते. दोघांचा मुक्काम शासकीय विश्रामगृहातच होता. त्यामुळे शुक्रवारपासूनच या दोघांच्या भेटीची शक्यता व्यक्त होत होती. अखेर रविवारी सकाळी उभयतांमध्ये भेट झाली.

दोन्ही पक्षांना मनपा निवडणुकीत एकमेकांची गरज लागण्याची शक्यता कार्यकर्त्यांकडून व्यक्त होत आहे. त्यामुळे राज ठाकरे आणि चंद्रकांत पाटील यांच्या भेटीला महत्व प्राप्त झालं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *