एकनाथ खडसेचा अधिकृतरित्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश
खडसे पक्षप्रवेशाच्या निमित्तानं भाजपवर बरसले…

मुंबई – भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी आज अधिकृतरित्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला. राष्ट्रवादीत प्रवेश दिल्यामुळे शरद पवारांचे आभार मानले. प्रवेशानंतर बोलताना त्यांचे भाजपा पक्षातील त्यांचे अनुभव सांगितले, की त्यांच्यावर भाजपमध्ये अन्याय होत असल्यानं त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश करावा असा आग्रह त्यांच्या कार्यकर्त्यांनी त्यांना केला होता.
भाजपपेक्षा दुप्पट वेगाने राष्ट्रवादी पक्षाचा विस्तार करेन असं त्यांनी यावेळी म्हटलं . माझ्या डोक्यावरील ओझे कमी झाल्यासारखे आज वाटत आहे.
भाजप सोडेल असा त्यांनी विचार केला नव्हता पण भाजपात माझी छळवणूक होत असल्यानं मी भाजप पक्ष सोडला असं त्यांनी म्हटलं. मी ४० वर्षे या पक्षासाठी काम केल आणि खूप संघर्ष केला पण मला काय मिळालं असे अनेक आरोप त्यांनी यादरम्यान केले.
खडसेंच्या प्रवेशाला सुमारे तासभर विलंब झाला. कारण शरद पवार आणि जितेंद्र आव्हाड यांच्यात बैठक झाली. ही बैठक प्रदीर्घ चाचल्यानं कार्यकर्त्यांना थोड तासभर वाट बघावी लागली. खडसे बऱ्याच दिवसांपासून नाराज होते कारण फडणवीस यांना मुख्यमंत्रीपद मिळाले, यावर त्यांची नाराजी होती. खडसेंच्या राष्ट्रवादीत प्रवेशामुळे भाजपातील अनेक नेते त्यांच्यावर टीका करत आहे.