Jaimaharashtra news

‘कोरोना प्रतिबंधक लसीच्या दोन्ही मात्रा घेतलेल्या नागरिकांना रेल्वे प्रवासाची मुभा द्यावी’

मुंबई: कोरोना प्रतिबंधक लसीच्या दोन्ही मात्रा घेतलेल्या नागरिकांना रेल्वे प्रवासाची मुभा देण्याची मागणी विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केली आहे. लसीच्या दोन्ही मात्रा घेतल्यानंतर नागरिकांना बाहेर पडण्याची परवानगी दिली पाहिजे असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलं होतं.

दरम्यान, परवानगी न मिळाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा भाजपने दिला आहे. ‘कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या नागरिकांना मुंबईमध्ये लोकलने प्रवास करण्याची परवानगी मिळावी.अन्यथा भाजप तीव्र आंदोलन करेल!’, असं ट्विट करत प्रवीण दरेकर यांनी तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे.

‘कोरोनामुळे सर्वसामान्य नागरिकांना बऱ्याच काळापासून रेल्वे प्रवास करु दिला जात नाही. त्यांना प्रवासादरम्यान बराच वेळ प्रतिक्षा करावी लागत आहे. तसेच प्रवासादरम्यानचा हा खर्चही न परवडणारा आहे. त्यामुळे ज्या नागरिकांनी कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस घेतलेले आहेत. त्यांना रेल्वे प्रवासाची परवानगी दिली पाहिजे. कोविडच्या संकट काळात सर्वसामान्य प्रवाशांना दिलासा द्यायला हवा’, असे प्रवीण दरेकर म्हणाले.

Exit mobile version