Sun. Aug 18th, 2019

रायगडमध्ये आंबेनळी घाटात बस कोसळली, 33 ठार

0Shares

जय महाराष्ट्र न्यूज, रायगड

रायगडमध्ये पोलादपूर – महाबळेश्वर महामार्गावर बस अपघात झाला आहे. आंबेळनेरी चिरेखिंड घाटामध्ये हा अपघात झाला आहे.
या अपघातात कोकण कृषी विद्यापीठाची मिनीबस दरीत कोसळली आहे. ही बस 500 फूट दरीत कोसळली आहे. अपघातात आतापर्यंत 3 जणांचे मृतदेह हाती आले आहेत.

महाबळेश्वरला पर्यटनासाठी निघालेल्या दापोली कृषी विद्यापीठाच्या कर्मचार्‍यांची मिनी बस सकाळी 10.30 च्या सुमारास आंबेनळी चिरेखिंड घाटात  कोसळली.

या अपघातात 33 जणांचा मृत्यू झाल्याची शक्यता असून यामध्ये आतापर्यंत 3 जणांचे मृतदेह हाती लागले आहेत. तर या अपघातात 1 जण बचावला आहे.

पोलीस आणि ट्रेकर्स घटनास्थळी दाखल झाले असून पाऊस व धुक्यामुळे मदत कार्याला अडथळा येत आहे.

मृतांची नावे – 

प्रशांत भांबीड, संदिप सुवरे, संदिप भोसले, संदीप झगडे
हेमंत सुर्वे, प्रमोद शिगवण पंकज कदम, सुनील कदम
जयंत चौगुले, किशोर चौगुले, रोशन तबीब, रतन पागडे,
संतोष जालगावकर, निलेश तांबे राजेश सावंत, सुनील साटले, 
विक्रांत शिंदे, राजेंद्र रिसबुड,  राजु बंडवे, सुयश बाल,
सचिन गिम्हवणेकर, रितेश जाधव संजय झगडे, प्रमोद जाधव,
शिवदास आगरे, राजाराम गावडे,  रवी सालवी

 

आतापर्यंत काय झालं – 

 • पोलीस आणि ट्रेकर्स घटनास्थळी दाखल
 • अपघातात एकजण बचावला
 • या अपघातात 33 जणांचा मृत्यू झाल्याची शक्यता
 • आंबेळनरी घाटात बस कोसळून भीषण अपघात
 • बसमध्ये 34 जण प्रवास करत होते
 • त्यापैकी केवळ एकच जण बचावला आहे
 • उर्वरीत 30 जण मृत्यमुखी पडल्याची भिती 
 • आतापर्यंत 3 जणांचे मृतदेह बाहेर काढलेत
 • ट्रेकर्सच्या 5 टीम मृतदेह बाहेर काढण्याच काम करत आहे
 • 100 ट्रेकर्स बचाव काम करताहेत
 • घटनास्थळी रायगड, सातारा पोलिस पथक, पुण्याचं NDRF टिम पोहोचली 
 • बसमधले सर्वच्या सर्वजण दापोली कृषी विद्यापीठाचे कर्मचारी 
 • सर्वच्या सर्व पावसाळी पर्यटनासाठी महाबळेश्वरला निघाले होते
 • आंबेनळी चिरेखिंड घाटामध्ये झाला अपघात 
 • पोलादपूर महाबळेश्वर बस अपघात 
 • 500 ते ६00 फूट खोल दरीत बस कोसळली 
 • अजून हि 25 ते 30 प्रवासी बेपत्ता
 • पोलादपूर- महाबळेश्वर महामार्गावर बस अपघात 
 • बस 200 फूट दरीत कोसळ्याची माहिती 
 • बस मध्ये ड्राइवर कंडक्टर सोबत 25 ते 30 प्रवासीही असण्याची शक्यता
 • सोलापूर महाबळेश्वर घाटात बस अपघात 
 • बस मध्ये ड्राइवर कंडक्टर सोबत इतर प्रवासीही असण्याची शक्यता
रायगडः पोलादपूर येथील दुर्घटनेसंबंधी माहिती व मदतीसाठी संपर्क क्रमांक:
चंद्रसेन पवार, महाड तहसीलदार (८४५४९९७७४०),
प्रदीप, कुडाळ (९४२२०३२२४४),
प्रदीप लोकरेः नायब तहसीलदार, रोहा (९४२३०९०३०१),
भाबडः नायब तहसीलदार, माणगाव (९४२२३८२०८१)

 

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *