Sat. Jun 12th, 2021

ज्येष्ठ अभिनेते रवी पटवर्धन यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

रवी पटवर्धन यांची ‘अग्गबाई सासूबाई’ ही शेवटची मालिका ठरली…

प्रसिद्ध अभिनेता ज्येष्ठ अभिनेते रवी पटवर्धन यांचे आज हृदयविकाराच्या झटक्याने त्यांच्या राहत्या घरी ठाण्यात निधन झाले. या बातमीमुळे संपूर्ण मराठी चित्रपटसृष्टीत शोककळा व्यक्त होतांना सोशल मीडियावर दिसत आहे. पटवर्धन अभिनयाने जोरावर चित्रपटसृष्टी प्रचंड नाव कमविले.

पटवर्धन यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी श्रद्धांजली वाहिली आहे. त्यांनी लिहलं, ‘रवी पटवर्धन यांच्या निधनाने चरित्र भूमिकेला आपल्या अभिनयाने “भारदस्तपणा” मिळवून देणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्याला आपण मुकलो आहोत ‘वयावर मात करुन जिद्दीने रंगभूमीची सेवा करणारा सच्चा कलाकार आज आपल्यातून गेला. दुरदर्शनवरील वस्ताद पाटील असो किंवा महाभारतातील धृतराष्ट्र असो, रवी पटवर्धन यांनी प्रत्येक लहान मोठ्या भूमिकांमध्ये अक्षरशः प्राण ओतला. असा चतुरस्त्र कलाकार आज आपल्यातून गेल्यानं मोठी हानी झाली,’ अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी श्रद्धांजली वाहिली आहे. तर अनेक मराठी कलाकार आणि राजकीय नेत्यानी देखील पटवर्धन यांना श्रद्धांजली वाहिली आहे. पटवर्धन यांनी अनेक नाटकांमध्ये काम केले आहे. शिवाय त्यांनी २०० हून अधिक चित्रपटात काम केले आहेत. पटवर्धन यांची ‘अग्गबाई सासूबाई’ ही शेवटची मालिका ठरली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *