Thu. Sep 23rd, 2021

मुख्यमंत्र्यांनी वाचवले दोन तरुणांचे प्राण

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे सोमवारी दुपारी आपली पत्नी रश्मी ठाकरे आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंसोबत पंढरपूरकडे रवाना झाले. या प्रवासादरम्यान पंढरपूर जवळील करंबक गावाजवळ दोन दुचाकीस्वारांचा अपघात झाल्याची माहिती मुख्यमंत्र्यांना मिळाली.

ही माहिती मिळाल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी वेळ न दवडता आपल्या ताफ्यातील सुरक्षारक्षकाची गाडी आणि रुग्णवाहिका या तरुणांच्या मदतीसाठी पाठवली. रुग्णवाहिका वेळेत मिळाल्यानं या दोन्ही तरुणांना लवकर उपचार मिळाले आणि त्यांचे प्राण वाचले.

मुख्यमंत्री पंढरपुरात दाखल झाल्यानंतर त्यांनी या दोन तरुणांच्या प्रकृतीची चौकशीदेखील केली. शिवसेनेच्या नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे यांनीही ट्वीट करत त्यांनी मुख्यमंत्र्यांना ‘संवेदनशील मुख्यमंत्री’ असंही म्हटलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *