Mon. Dec 6th, 2021

मुख्यमंत्र्यांकडून टाळेबंदी वाढीबाबत घोषणा

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी राज्यातील टाळेबंदी आणखी १५ दिवसांसाठी वाढवली असल्याची घोषणा केली आहे. त्यामुळे राज्यातील टाळेबंदी ही आता १५ जूनपर्यंत असणार आहे. तसेच ज्या भागात कोरोना रुग्णसंख्या वाढत आहे त्या भागातील निर्बंध आणखी कडक करण्याचे संकेत मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.

‘राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या काही प्रमाणात खाली आली आहे. पण अद्यापही आपण कोरोनाच्या नव्या विषाणूवर ताबा मिळवू शकलेलो नाही. अशा परिस्थितीत तिसरी लाट आली तर सर्व कठीण होऊन बसेल. कोरोनाचा नवा म्युटंट आणि तिसरी लाटेचा सामना करणं कठीण होईल, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले आहेत .

कोरोनामुक्त गाव मोहीम
मी माझं गाव कोरोनामुक्त करेन असं प्रत्येकाने ठवरलं,सगळ्यांनी माझं घर कोरोनामुक्त ठेवायचं ठरवलं तर आणि असाच प्रयत्न सगळ्यांनी केला तर महाराष्ट्र कोरोनामुक्त होऊ शकतो. पोपटराव पवार, ऋतुराज देशमुख आणि कोमलताई यांनी हे करुन दाखवलं आहे. आजपासून आपण गाव कोरोनामुक्त करायचं आपण ठरवायचं आहे’, असं मुख्यमंत्री म्हणाले.

कोरोनासोबत राहायचं नाही तर त्यावर मात करायची आहे
‘वर्क फ्रॉम होमसारखं शिक्षणाचं करता येईल का या गोष्टी आपण पाहत आहोत. तिसऱ्या लाटेवर चर्चा करताना मी उद्योगपतींशी चर्चा केली होती. अर्थचक्र फिरतं राहिलं पाहिजे.आपल्याला कोविडसोबत राहायचं नाही तर त्यावर मात करायची आहे’

बारावीच्या परीक्षेवर लवकरच निर्णय, आढावा घेत आहोत
‘या वर्षी दहावीच्या परीक्षा न घेता त्यांचे मुल्यांकन करुन त्यांचा निकाल लावणार आहोत. बारावीच्या परीक्षांचासुद्धा निर्णय घ्यावा लागेल. त्यासाठी कोणती पद्धत ठेवता येईल याचा आढावा घेत आहोत. त्याविषयी लवकरच निर्णय घेण्यात येईल. याबाबत केंद्रानेसुद्धा धोरण ठऱवायला हवे’

तिसरी लाट आपल्या वागणुकीवर अवलंबून, नवा विषाणू जास्त घातक
तिसरी लाट आपल्या वागणुकीवर अवलंबून आहे. आताचा जो विषाणू आहे तो झपाट्याने वाढतो आहे. तो झपाट्याने पसरतोय. रुग्णाला बरं व्हायला उशीर लागतोय. ऑक्सिजनची आवश्यकता वाढली. काही जणांना ऑक्सिजनची गरज जास्त लागली.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *