Mon. Dec 6th, 2021

राज्यातील कोरोना रुग्णसंख्येत चढउतार कायम

राज्यातील कोरोना रुग्णसंख्येत चढउतार कायम असून गुरुवारी एकूण ९ हजार ८४४ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे, तर ९ हजार ३७१ जण बरे होऊन घरी परतले आहेत. तसेच गुरुवारी दिवसभरात एकूण १९७ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

राज्याचा रुग्ण बरे होण्याचा दर ९५.९३ % इतका झाला आहे, तसेच राज्याचा मृत्यूदर हा २ टक्के इतका झाला आहे. राज्यात सध्या एकूण १ लाख २१ हजार ७६७ सक्रीय रुग्ण आहेत.

मुंबईत गुरुवारी ७८९ नवीन कोरोनाबाधितांची नोंद झाली, तर १० रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे आता एकूण बाधितांची संख्या ७ लाख २४ हजारांपुढे गेली आहे. त्याचप्रमाणे मुंबईत गुरुवारी ५४२ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *