Tue. Sep 28th, 2021

राज्यातील कोरोना रुग्णसंख्येत वाढ

राज्यात मंगळवारी सोमवारच्या तुलनेत कोरोना रुग्णसंख्येत, तसेच मृत्यूसंख्येत वाढ झाली आहे. महाराष्ट्रात मंगळवारी ८ हजार ४१८ नवे कोरोनाबाधित रुग्ण सापडले आहेत, तर १० हजार ५४८ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.

राज्यात आजपर्यंत एकूण ५८ लाख ७२ हजार २६८ रुग्ण कोरोनातुन बरे झाले आहेत. यामुळे राज्याचा रुग्ण बरे होण्याचा दर हा ९६.०६ टक्के इतका झाला आहे. कोरोनामुळे मंगळवारी १७१ जणांचा मृत्यू झाला आहे.

मुंबईतील कोरोनारुग्णांचा आकडा हा आता ५०० च्या खाली आला आहे. मुंबईतील बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ही ६ लाख ९९ हजार ८२३ इतकी झाली आहे. मुंबईचा रुग्ण बरे होण्याचा दर हा ९६ टक्के इतका झाला आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *