Wed. Jan 19th, 2022

राज्यातील कोरोनाच्या सक्रिय रुग्णसंख्येत सातत्याने घट

राज्यात शुक्रवारी ९ हजार ७९८ नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे, तर १४ हजार ३४७ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. शुक्रवारी दिवसभरात १९८ रुग्णांचा मृत्यू झाला. राज्यातील उपचाराधीन रुग्णांची संख्या सध्या १ लाख ३४ हजार ७४७ इतकी आहे.

मुंबईतील रुग्णवाढीचा दर ०.०९ टक्यांपर्यंत खाली आला आहे. मुंबईत सध्या १४ हजार ८६० उपचाराधीन रुग्ण आहेत. गुरुवारी ३० हजार ४४७ चाचण्या करण्यात आल्या होत्या. रुग्ण दुपटीचा कालावधी हा ७३४ दिवसांवर पोहोचला आहे. तसेच ठाणे जिल्ह्यात शुक्रवारी ४१७ नवे कोरोनाबाधित आढळून आले आहेत, तर १३ जणांचा मृत्यू झाला आहे.

दिलासादायक बाब म्हणजे मुंबई, पुणे, ठाणे, नागपूर, नाशिक अशा प्रमुख शहरांत रुग्णसंख्येत मोठी घट पाहायला मिळत असून कोरोना पॉझिटिव्हिटी रेटही खाली आला आहे. राज्यात सक्रिय रुग्णांच्या संख्येत सातत्याने घट होत असून रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही आता ९६ टक्क्यांच्या जवळ पोहचले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *