Fri. Oct 22nd, 2021

राज्यात रविवारी ९ हजार ९७४ नवे कोरोनाबाधित

राज्यात कोरोनाची दुसरी लाट ओसरत असतानाच आता कोरोनाच्या डेल्टा प्लस व्हेरिएंटने चिंता वाढवली आहे. राज्यात रविवारी दिवसभरात ९ हजार ९७४ नवे कोरोनाबाधित आढळून आले आहेत, तर ८ हजार ५६२ रुग्ण बरे झाले आहेत.

रविवारी राज्यात १७९ कोरोनारुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यात एकूण सक्रिय कोरोनारुग्णांची संख्या १ लाख २२ हजार २५२ रुग्ण इतकी झाली आहे. डेल्टा प्लसची रुग्णसंख्या लक्षात घेऊन राज्यात आजपासून तिसऱ्या टप्प्यातील निर्बंध लागू करण्यात आले आहेत.

मुंबईमध्ये रविवारी ७४६ नव्या रुग्णांची नोंद झाली, तर १३ जणांचा मृत्यू झाला आहे. मुंबईत एकूण बाधितांची संख्या ७ लाख २० हजारांच्या पुढे गेली आहे. रविवारी १,२९५ रुग्ण बरे झाले आहेत, तर ८,५८२ रुग्ण हे उपचाराधीन आहेत. मुंबईतील रुग्णवाढीचा दर ०.०९ टक्क्यांपर्यंत खाली आला आहे, तर रुग्णदुपटीचा कालावधी ७२८ दिवस इतका झाला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *