Mon. Sep 27th, 2021

राज्यात गुरुवारी ८ हजार १० नव्या कोरोनारुग्णांची नोंद

महाराष्ट्र: राज्यात कोरोनारुग्णांची संख्या कमी होत आहे. राज्यात गुरुवारी ८ हजार १० नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर ७ हजार ३९१ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. राज्यात आतापर्यंत ५९ लाख ५२ हजार ४४० रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९६.१७ टक्के आहे.

मुंबईत गेल्या काही दिवसांपासून कोरोना नियंत्रणात असल्याचं पाहायला मिळत आहे. मुंबईत गुरुवारी ५४५ कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर ५०५ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. मुंबईत आतापर्यंत ७लाख ४ हजार ७६४ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. मुंबईचा रिकव्हरी रेट ९६ टक्के झाला आहे. तर मुंबईत गुरुवारी 13 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या मुंबईत ७,०१४ रुग्ण सक्रिय आहेत. तर रुग्ण दुपटीचा दर 948 दिवसांवर गेला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *