Thu. Jan 27th, 2022

राज्यात बुधवारी ८ हजार १५९ नवे कोरोनाबाधित; महाराष्ट्राची कोरोनाबळींच्या यादीत मुसंडी

महाराष्ट्रातील कोरोना रुग्णसंख्येत वाढ झाली आहे. तसेच कोरोनामुक्त झालेल्या रुग्णसंख्येतही घट झाली आहे. राज्यात बुधवारी ८ हजार १५९ कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे, तर ७ हजार ८३९ जण कोरोनामुक्त झाले आहेत. तसेच १६५ कोरोनामृत्यूची नोंद झाली आहे.

राज्यात आजपर्यंत एकूण १ लाख ३० हजार ९१८ कोरोनाबाधित रूग्णांचा मृत्यू झाला असून सध्या ९४ हजार ७४५ रुग्ण उपचाराधीन आहेत.

मुंबईत गेल्या बुधवारी ५६० जणांनी कोरोनावर मात केली आहे, तर ४३० नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. तसेच बुधवारी १३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या मुंबईत ६ हजार २० रुग्ण उपचाराधीन आहेत.

महाराष्ट्रातील लपवलेले कोरोनाबळी उघडकीस

महाराष्ट्रात कोरोनाबळींची धक्कादायक आकडेवारी उघडकीस आली आहे. राज्यात मंगळवारी तब्बल ३ हजार ६५६ कोरोनाबळींची नोंद झाली असून कागदोपत्री कोरोनाबळी अचानक वाढले आहेत. त्यामुळे महाराष्ट्राने लपवलेले कोरोनाबळी समोर आले आहेत. कोरोनाबळींचे आकडे मंगळवारी महाराष्ट्राने अचानक २ हजार ४७९ने वाढवले असून महाराष्ट्राची कोरोनाबळींच्या यादीत मुसंडी मारली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *