Mon. Dec 6th, 2021

राज्यात आजपासून जुनेच निर्बंध नव्याने

राज्यातील कोरोनाची रुग्णसंख्या घटल्यामुळे तीन आठवड्यांपूर्वी शिथिल केलेले निर्बंध कोरोनाच्या उत्परिवर्तित विषाणूच्या (डेल्टा प्लस) प्रादुर्भावाचा धोका आणि तिसऱ्या लाटेचा इशारा या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा कठोर करण्याचा निर्णय शुक्रवारी घेण्यात आला. हे जुनेच निर्बंध सोमवारपासून राज्यात नव्याने लागू होणार आहेत.

मुंबईतील हे निर्बंध आणखी तीन महिने कायम ठेवण्याचे संकेत सरकारने दिले आहेत. निर्बंध शिथिल करण्यात आल्यावर गर्दी झाल्याचे आणि नागरिक नियम पळत नसल्याचे सरकारला आढळले, असे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी लागू केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये म्हटले आहे.

 

कसे असतील निर्बंध? पाहूया

 • सोमवारपासून अंमलबाजवणी
 • दुकाने दुपारी ४ पर्यंतच खुली, संध्याकाळनंतर संचारबंदी
 • दुकाने शनिवार-रविवार बंद राहतील
 • मुंबईतील निर्बंध आणखी तीन महिने कायम ठेवण्याचे संकेत
 • मुंबईतील उपनगरी रेल्वेप्रवास सर्वसामान्यांसाठी दूरच
 • नव्या निर्बंधांनुसार पहिले दोन स्तर रद्द
 • पहिल्या आणि दुसऱ्या स्तरातील जिल्ह्यांचा समावेश तिसऱ्या स्तरात
 • बहुतेक जिल्हे तिसऱ्या स्तरात, सोमवारपासून अंमलबजावणी
 • ‘अ‍ॅन्टिजेन’ऐवजी ‘आरटी-पीसीआर’ चाचणी अहवाल महत्वाचे
 • अहवालाच्या आधारेच साप्ताहिक संसर्गदर निश्चित करण्याची तरतूद
 • उपाहारगृहे दुपारी ४ पर्यंत ५० टक्के क्षमतेने, नंतर घरपोच सेवा सुरू

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *