महाविद्यालयं बंद करण्याचा निर्णय कुलगुरू-जिल्हाधिकाऱ्यांच्या हाती; उदय सामंत यांची घोषणा

मुंबई, पुणे, विदर्भ आणि मराठवाड्यात म्हणजेच राज्यातील अनेक शहरांत कोरोनाचा प्रादुर्भाव होत असतांना दिसत आहे. आता यात उदय सामंत यांनी एक घोषणा केली असून महाविद्यालये सुरू ठेवण्याचा निर्णय कुलगुरू आणि जिल्हाधिकाऱ्यांनी चर्चा करून घ्यावा. असे निर्देश देण्यात आले असून महत्वाची भूमिका सामंत यांनी आज घेतली आहे. राज्यात कोरोनाचा प्रसार होत असून चिंताजन स्थिती होण्याची शक्यता ही मुख्यमंत्र्यानी वर्तवली आहे.
राज्य सरकारबरोबरच स्थानिक जिल्हा प्रशासनाकडून उपाययोजना केल्या जात आहेत. शिवाय राज्यातील पुणे, नागपूर, अमरावतीसह काही जिल्ह्यात पुन्हा निर्बंध घालण्यात आले आहे. शाळा-महाविद्यालये सुरू ठेवणार की बंद करणार हा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. महाविद्यालये आणि परीक्षांचं काय होणार अशीही चर्चा केली जात आहे. शिवाय उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी आज स्पष्टीकरण दिलं आहे.
“करोनाचे रुग्ण वाढत असेल तर. कंटेनमेंट झोन होणार शिवाय जिल्हाधिकारी हे जिल्ह्याचे आपत्ती व्यवस्थापन प्रमुख आहेत. त्यांना जिल्ह्याची परिस्थिती माहिती असते. त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता असेल तर त्याचा फटका हा विद्यार्थी आणि शिक्षकांना बसणार असेल, तर कुलगुरुंनी जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करून महाविद्यालयं सुरू ठेवण्याचा निर्णय दोघांनी घ्यावा,” अशी माहिती उदय सामंत यांनी दिली आहे.