Tue. Dec 7th, 2021

मुंबईतील कोरोना रुग्णसंख्येत घट

मुंबई: मुंबईत शनिवारी ८६६ नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे, तर दिवसभरात २९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्याचबरोबर १०४५ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. मुंबईतील रुग्णवाढीचा दर ०.१३ टक्क्यांपर्यंत खाली आला असून रुग्णदुपटीचा कालावधी ५११ दिवसांपर्यंत वाढला आहे.

त्यामुळे आता एकूण कोरोनाबाधितांची संख्या ७ लाख १० हजारापुढे गेली आहे. तसेच आतापर्यंत ९५ टक्के रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या १६ हजार १३३ रुग्ण उपचाराधीन आहेत.

मुंबईत आतापर्यंत ६३ लाखांहून अधिक चाचण्या करण्यात आल्या आहेत. मुंबईतील रुग्णवाढीचा दर ०.१३ टक्क्यांपर्यंत खाली आला आहे. रुग्ण दुपटीचा कालावधीही ५११ दिवसांवर पोहोचला आहे.

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *