Mon. Sep 27th, 2021

मुंबईत बुधवारी ६३५ नवे कोरोनाबाधित

मुंबई: मुंबईत बुधवारी ६३५ नव्या कोटोनरुग्णांची नोंद झाली, तर १० रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर बुधवारी ५८२ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. रुग्णदुपटीचा कालावधीही ९२८ दिवसांवर पोहोचला आहे.

मुंबईत एकूण कोरोनाबाधितांची संख्या ७ लाख २९ हजारांपुढे गेली आहे.तसेच आतापर्यंत एकूण ९६ टक्के रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. मुंबईतील रुग्णवाढीचा दर ०.०७ टक्क्यांपर्यंत खाली आला आहे

देशात कोरोनाची दुसरी लाट पुन्हा एकदा वेग घेताना दिसत आहे. बुधवारी देशात १,८५४ नवे कोरोनाबाधित आढळले, तर ५८० जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *