Sat. Sep 18th, 2021

महाराष्ट्रासाठी दिलासादायक बातमी

राज्यात कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत असून गेल्या सहा दिवसात राज्यातील ४ लाख ४२ हजार ४६६ जणांनी कोरोनावर मात केली आहे. राज्यात ७१ हजार ३६ रुग्णांना घरी सोडण्यात आले. त्यात सर्वाधिक १३ हजार ६७४ रुग्ण पुण्यातील आहेत, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

राज्यात गेल्या दोन महिन्यांपासून दररोज विक्रमी वाढ होत आहे. दररोज रुग्णांची संख्या ६० हजारांच्या वर आहे. राज्यात डॉक्टर्स, नर्स यांच्या प्रयत्नांमुळे कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे दररोज कोरोना रुग्णसंख्येत मोठी वाढ होत असली तरी कोरोनावर मात करणाऱ्यांची संख्या ही वाढत आहे.

२० एप्रिल – ५४ हजार २२४
२१ एप्रिल- ५४ हजार ९८५
२२ एप्रिल- ६२ हजार २९८
२३ एप्रिल- ७४ हजार ४५
२४ एप्रिल- ६३ हजार ८१८
२५ एप्रिल- ६१ हजार ४५०
२६ एप्रिल- ७१ हजार ७३६

संपादन: सिद्धी भरत पाटील

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *