Jaimaharashtra news

राज्यातील कोरोना रुग्णसंख्येत घट

राज्यामध्ये टप्प्याटप्प्याने निर्बंध शिथिल करण्यास सुरुवात झाली आहे. आरोग्य विभागाने शनिवारी दिलेल्या आकडेवारीनुसार राज्यात शनिवारी एकूण १० हजार ६९७ नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. कोरोनाबाधितांचं प्रमाण कमी होत असल्याचं दिसून येत आहे. यामुळे राज्यातील एकूण बाधितांची संख्या ५८ लाख ९८ हजार ५५० इतकी झाली आहे. मात्र, त्याचवेळी यातले ५६ लाख ३१ हजार ७६७ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. त्यामुळे राज्याचा रिकव्हरी रेट ९५.४८ टक्के इतका झाला आहे.

शनिवारी दिवसभरात १४ हजार ९१० रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. मात्र एकूण कोरोनाबाधितांची संख्या अधिक असल्यामुळे राज्याचा मृत्यूदर १.८४ टक्के आहे. तर राज्यातील वाढती मृत्यूंची संख्या ही चिंतेची बाब ठरली आहे. शनिवारी राज्यात ३६० मृत्यूंची नोंद झाली आहे. तर राज्यातील एकूण मृत्यूंची संख्या १ लाख ८ हजार ३३३ इतकी झाली आहे.

Exit mobile version