Sun. Apr 5th, 2020

दुधदरवाढीसाठी शेतकऱ्यांचं गांधीगिरी मार्गानं आंदोलन

जय महाराष्ट्र न्यूज, औरंगाबाद

दूधदरासाठी दूध उत्पादक शेतकरी आता फुकट दूध वाटणार आहेत. 3 मे पासुन शेतकरी फुकट दूध वाटून दूधदरवाढीचा निषेध करणार आहेत. दुधाला लीटरमागे 27 रुपये हमीभाव देण्याची घोषणा राज्य सरकारनं केली होती. या घोषणेला वर्ष उलटलं तरीही त्याची अंमलबजावणी झालेली नसून सध्या दुधाला 16 ते 17 रुपये लीटर कवडीमोल भाव मिळतोय.

त्यामुळे दूध उत्पादक शेतकरी अडचणीत आला आहे, याचा निषेध म्हणून गांधीगिरी मार्गानं आंदोलन करण्याचा निर्णय दूध उत्पाद शेतकऱ्यांनी घेतला आहे. शेतकरी मेला तरी चालेल, सरकार आणि कारखाने सुखाने रहा असे सांगत शेतकरी 3 मे पासून दूध फुकट वाटणार आहेत.

औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यातल्या लाखगंगा गावात ग्रामसभा पार पडली. या ग्रामसभेला औरंगाबाद आणि नगर या दोन जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी एकत्र येत आंदोलनाची दिशा ठरवली. मागील वर्षी शेतकरी आंदोलनाची सुरुवात याचं परिसरातून झाली होती. आता दूध दराचं आंदोलनही याच परिसरातून पेट घेणार असं चित्र दिसून येत आहे,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *