Thu. Sep 29th, 2022

‘एमपीएससीबाबत राज्य सरकारने गंभीर व्हावं’

राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन आजपासून सुरू झाले असून महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत उत्तीर्ण होऊनही नोकरी न मिळाल्यामुळेस्वप्निल लोणकर या विद्यार्थ्याने आत्महत्या केली. यावरून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ‘सरकार एमपीएससीबाबत गंभीर नाही’, अशी टीका केली आहे.

‘स्वप्निलने जे टोकाचं पाऊल उचललं, त्यावर तातडीने विचार व्हायला हवा. अशा घटना होईपर्यंत सरकार आणि आयोग काय करतं?’, असा सवाल देवेंद्र फडणवीस यांनी विचारला आहे. अधिवेशनात फक्त देवेंद्र फडणवीस, तसेच सुधीर मुनगंटीवार यांनीसुद्धा स्वप्निलच्या आत्महत्या प्रकरणावर जोरदार टीका केली आहे.

‘कालपासून १०० विद्यार्थ्यांचे फोन येऊन गेले,४३० एमपीएससीच्या विद्यार्थ्यांनी आत्मदहनाचा इशारा सरकारला दिला आहे. नियुक्त्या रखडल्याने विद्यार्थी नैराश्येत आहेत. त्यांना यातून बाहेर काढण्याची गरज आहे. स्वप्निल लोणकरच्या कुटुंबाला ५० लाख रुपयांची मदत जाहीर करा’, अशी मागणी सुधीर मुनगंटीवार यांनी केली आहे.

तसेच, ‘संसदीय आयुध गोठवण्याचे काम सरकारने केले आहे. लोकशाहीला कुलूप लावण्याचे काम सरकारने केले आहे. आजच इतकी विधेयके मांडायची आणि आजच पास करायचे हे बरोबर नाही. तात्काळ सर्व निर्णय मागे घ्या. विधेयकाचा अभ्यास करण्यासाठी अवधी द्या’, अशी मागणीही फडणवीस यांनी केली.

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.