India World

#Mahashivratri: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं गंगेत स्नान

आज महाशिवरात्रीनिमित्त भाविकांमध्ये उत्साह पाहायला मिळतो. देशातील 12 ज्योतिर्लिंगाच्या ठिकाणी मोठी गर्दी झाली. तसेच महाशिवरात्रीनिमित्त उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथील कुंभमेळ्यात भाविकांनी मोठ्याप्रमाणात गर्दी केली. तसेच या निमित्ताने राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी सकाळी कुंभमेळ्याला भेट दिली. तसेच त्यांनी त्रिवेणी संगमावर गंगेत स्नान केलं.

कुंभमेळ्याचा उत्साह

महाकुंभमेळ्यात भाविकांनी प्रचंड गर्दी केली होती.

सगळीकडे वंदे मातरम, मोदी- मोदी अशी घोषणा होत्या.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कुंभमेळ्याला भेट दिल्यानंतर आपल्या ट्विटरवरून फोटो आणि व्हिडिओ शेअर केले आहेत.

तसेच देवेंद्र फडणवीस यांनी कुंभमेळ्यातील स्वच्छतेविषयी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे कौतुक केलं आहे.

गेल्या वर्षी 24 फेब्रुवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी उत्तर प्रदेशच्या दौऱ्यावर असताना त्यांनी त्रिवेणी संगमावर जाऊन गंगेत स्नान केलं होतं.

महाशिवरात्री निमित्त देशासह महाराष्ट्रात सगळीकडेच भावनिक वातावरण निर्माण झालं.

पुण्यातील भिमाशंकर,त्र्यंबकेश्वर,परळीचे वैजिनाथ,परभणीचे औंढ नागनाथ आणि औरंगाबाद येथील घृष्णेश्वर मंदिरात भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळते.

Jai Maharashtra News

Recent Posts

समीर वानखेडे यांची मलिकांविरोधात तक्रार

जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडून अमलीपदार्थ नियंत्रण विभागाचे मुंबईचे माजी विभागीय संचालक समीर वानखेडे यांना नुकताच…

1 hour ago

‘लोक निवडून देतात ती घराणेशाही कशी?’

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाच्या अमृतमहोत्सवी स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्यावरून केलेल्या भाषणात घराणेशाही आणि भ्रष्टाचारावर टीका…

4 hours ago

मुकेश अंबानींच्या कुटुंबियांना धमकी

प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी आणि कुटुंबियांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. चार ते पाच…

4 hours ago

‘भ्रष्टाचार आणि घराणेशाही ही देशाला लागलेली कीड’

७५ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्ताने पंतप्रधान मोदींच्या हस्ते लाल किल्ल्यावर ध्वजारोहण पार पडला. यावेळी देशाला संबोधित…

4 hours ago

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते लाल किल्ल्यावर ध्वजारोहण

 देशाचा आज ७५ वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. आज शासकीय कार्यालये,…

5 hours ago

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचं संबोधन

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला देशाला उद्देशून भाषण केले. या भाषणात त्यांनी देशाच्या आशा-आकांक्षा…

20 hours ago