Wed. Jan 19th, 2022

मंदाकिनी एकनाथ खडसे यांनाही ईडीचे समन्स

पुण्यातील भोसरी एमआयडीसी जमीन व्यवहार प्रकरणी जावई गिरीश चौधरी यांच्या अटकेनंतर खडसेंची चौकशी करण्यात आली. मात्र आता एकनाथ खडसेंपाठोपाठ खडसे यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे यांनाही ईडीने समन्स बजावला असल्याचं समोर येत आहे. मात्र मंदाकिनी यांनी ईडीकडे १४ दिवसांचा वेळ वाढवून मागितला आहे.

मंदाकिनी खडसे यांनाही भोसरी एमआयडीसी जमीन व्यवहार प्रकरणी चौकशीसाठी ईडी कार्यालयात हजर राहण्याचे समन्स बजावण्यात आले. पुण्यातील भोसरी एमआयडीसी जमीन व्यवहार प्रकरणी जावई गिरीश चौधरी यांच्या अटकेनंतर खडसेंची चौकशी करण्यात आली.

मंदाकिनी खडसे निवेदन देऊन १४ दिवसांची वेळ मागितली आहे. परंतु ईडीने त्यांना अजून कोणताही प्रतिसाद दिला नसल्याचे सांगितले जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *