Sunday, February 15, 2026 07:09:16 AM

BMC Election Results 2026 : महायुतीचं टेन्शन वाढलं, मुंबई महापालिकेत भाजप-ठाकरे गटात जोरदार फाईट

bmc election results 2026  महायुतीचं टेन्शन वाढलं मुंबई महापालिकेत भाजप-ठाकरे गटात जोरदार फाईट

मुंबई महानगरपालिका निवडणूक 2026 च्या पहिल्या कलांमध्ये भारतीय जनता पक्षाने (भाजप) आघाडी घेतल्याची माहिती समोर आली आहे.सुरुवातीच्या कलांमध्ये भाजप-शिंदे युती 20 जागांवर आघाडीवर होती, तर ठाकरे गट 13 जागांवर होता. त्यानंतर आकडे बदलून भाजप-शिंदे युती 22 ते 23 जागांवर पुढे होती. 

10.45 : काँग्रेसला पाच जागांवर आघाडी मिळाली, तर मनसे तीन जागांवर आघाडीवर होती. हे आकडे सातत्याने बदलत असून, मुंबईतील 46 जागांचे पहिले कल हाती आले आहेत. 

 मुंबईच नव्हे, तर नागपूर, पुणे आणि ठाण्यासह एकूण 29 महापालिकांचे निकालही येत आहेत. नागपूरमध्ये भाजपने पाच जागांवर आघाडी घेतली आहे, जिथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विक्रमी विजयाची आशा व्यक्त केली होती.

10.54 AM : महापालिकेचे कल हाती येत असून मुंबईमध्ये भाजपा आणि शिवसेना शिंदे गटाने जोरदार कामगिरी केल्याचे बघायला मिळत आहे. भाजपा आणि शिवसेना शिंदे गट 50 जागांवर आघाडीवर आहे.

11.15 AM: दहिसर प्रभाग क्रमांक मधून शिंदे यांच्या शिवसेनेच्या रेखा यादव आघाडीवर आहेत.

वॉर्ड क्रं 124 मधून ठाकरेच्या उमेदवार सकीना शेख आघाडीवर आहेत.

11.20 AM : वॉर्ड क्रं 135 मधून भाजपचे नवनाथ बन पिछाडीवर आहेत.

वॉर्ड क्रं 165 काँग्रेसचे अश्रफ आझमी आघाडीवर आहेत.

11.24 AM : मुंबईत 227 पैकी 159 जागांचे कल हाती आले आहेत. भाजप, शिवसेना महायुती 80 जागांवर आघाडीवर आहे.

ठाकरे बंधु 64 जागांवर आघाडीवर आहेत.

भाजप 55 जागांवर आघाडीवर.

एकनाथ शिंदे शिवसेना 20 जागांवर आघाडीवर.

उद्धव ठाकरे गट 57 जागांवर आघाडीवर

मनसे 7 जागांवर आघाडीवर आहे.

काँग्रेस 9, राष्ट्रवादी 1 आणि इतर 5 जागांवर आघाडीवर आहेत.

11.36 AM :  मुंबईतून पहिला निकाल ; काँग्रेसच्या आशा काळे विजयी

11.37 AM : भाजपाचे नवनाथ बन प्रभाग क्रमांक 135 मधून 506 मतांनी पुढे 

11.38 AM भाजपचे अजय पाटील आघाडीवर

11.39 AM : मुंबई प्रभाग २ मधून तेजस्वी घोसाळकर विजयी 

11.42 AM : मुंबई प्रभाग 135 मधून नवनाथ बन विजयी 

11.59 AM : मुंबईत प्रभाग क्रमांक 163 मधून शिंदेंच्या शिवसेनेच्या उमेदवार शैला दिलीप लांडे विजयी


 


सम्बन्धित सामग्री