Friday, March 13, 2026 07:18:52 AM

Chhatrapati Sambhajinagar ZP Election 2026 : जिल्हा परिषदेवर महायुतीचा डंका; पाहा विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी

छत्रपती संभाजीनगरमधील विजयी उमेदवारांची यादी.

chhatrapati sambhajinagar zp election 2026  जिल्हा परिषदेवर महायुतीचा डंका पाहा विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी

विजय चिडे, प्रतिनिधी 

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषद, पंचायत समितीचा निकाल हाती आला आहे. यामध्ये भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला असून जिल्हा परिषदेमध्ये भाजपाचे 23 सदस्य निवडून आले आहेत. तर शिवसेना शिंदे गटाचे 21 सदस्य निवडून आले आहेत. तर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे 9 जिल्हा परिषद सदस्य निवडून आले आहेत. दोन्ही राष्ट्रवादीचे 5 तर अपक्ष 4 सदस्य निवडून आले आहेत. तसेच बच्चू कडू यांच्या प्रहार पक्षानेही एक जिल्हा परिषद सदस्य  निवडून आणून आपलं खातं उघडलं आहे. खासदार संदिपान भुमरे, आमदार विलास भुमरे यांनी आपला बालेकिल्ला सांभाळल्याचे पाहायला मिळाले. खासदार भुमरे यांनी पैठण मतदारसंघातील 9 पैकी 8 जागेवर वर्चस्व कायम ठेवले आहे. तर माजी मंत्री अब्दुल सत्तार यांनीही सिल्लोडमध्ये 6 जिल्हा परिषद सदस्य निवडून आणले आहे. मात्र शिंदेसेनेचे पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या मतदारसंघांमध्ये चारही जागेवर शिवसेनेला परभावाला सामोरे जावा लागला आहे. पंचायत समितीच्या 9 पैकी 6 पंचायत समित्यांवर भाजपचे वर्चस्व पाहायला मिळत आहे. तर 3 ठिकाणी शिंदे गटाचे वर्चस्व आहे. यामध्ये सिल्लोड सोयगाव मतदारसंघात या अगोदर एक हाती सत्ता घेणाऱ्या अब्दुल सत्तार यांना मोठा धक्का बसला. सिल्लोड सोयगाव पंचायत समितीवर भाजपने वर्चस्व स्थापन केले आहे. त्यामुळे जिल्ह्यात आजी-माजी पालकमंत्र्यांच्या बालेकिल्ल्यात त्यांच्या सत्तेला सुरुंग लागला आहे.

हेही वाचा : Chhatrapati Sambhajinagar ZP Election 2026 : जिल्हा परिषद, पंचायत समितीमध्ये भाजपच मोठा पक्ष; तर शिंदेसेनेच्या आजी-माजी पालकमंत्र्यांना धक्का

एकूण गटनिहाय स्थिती 

भाजप = 23 + 2 पुरस्कृत

शिवसेना (शिंदे) = 21 + 1 पुरस्कृत

शिवसेना (उबाठा) = 9

राष्ट्रवादी काँग्रेस = 04

राष्ट्रवादी काँग्रेस (शप गट) = 01

काँग्रेस = 01

अपक्ष = 01

कोणत्या गटामधून कोणत्या पक्षाचा उमेदवार विजयी - 

 छत्रपती संभाजीनगर तालुका (10) 

* लाडसावंगी – राधाकिशन पठाडे – शिवसेना (शिंदे) 
* गोलटगाव – ज्योती शिंदे – अपक्ष 
* करमाड – साधना कुलकर्णी – भाजप 
* सावंगी – अजिनाथ धामणे – भाजप 
* दौलताबाद – लंकाबाई जाधव – भाजप 
* वडगाव (को.) उत्तरपूर्व – ललिता सोनवणे – शिवसेना (उबाठा) 
* वडगाव (को.) मध्यपश्चिम – सचिन गरड – अपक्ष (भाजप पुरस्कृत) 
* पंढरपूर – विद्या गायकवाड – शिवसेना (उबाठा) 
* आडगाव बु. – विजय घोडके – शिवसेना (शिंदे) 
* पिंप्री बु. – जयश्री पवार – भाजप 

पैठण तालुका (9) 

* चितेगाव – कृष्णा गिधाने – शिवसेना (शिंदे) 
* बिडकीन – मनोज पेरे – शिवसेना (उबाठा) 
* आडूळ बु. – रुपाली तवार – शिवसेना (शिंदे) 
* पाचोड बु. – शिवराज भूमरे – शिवसेना (शिंदे) 
* दावरवाडी – जयश्री वाघमोडे – शिवसेना (शिंदे) 
* ढोरकिन – राधिका जगताप – शिवसेना (शिंदे) 
* पिंपळवाडी – कारभारी लोहकरे – शिवसेना (शिंदे) 
* विहामांडवा – नितीन तांबे – शिवसेना (शिंदे) 
* नवगाव – पांडुरंग औटे – शिवसेना (शिंदे) 

गंगापूर तालुका (9) 

* सावंगी – संगीता अमराव – भाजप 
* अंबेलोहळ – रतन बत्तीसे – भाजप 
* रांजणगाव शे.पुं. – अमोल लोहकरे – भाजप 
* वाळूज बु. – बालाजी सोनटक्के – राष्ट्रवादी काँग्रेस
* तुर्काबाद – स्वाती पाटेकर – शिवसेना (शिंदे) 
* शिल्लेगाव – सविता जाधव – भाजप 
* नेवरगाव – वैजयंती शिरसाठ – राष्ट्रवादी काँग्रेस
* जामगाव – दीपा मुंदडा – अपक्ष (भाजप पुरस्कृत) 
* शेंदूरवादा – कृष्णा साहेबराव पाटील – शिवसेना (उबाठा) 

वैजापूर तालुका (8) 

* वाकला – पार्वतीबाई जाधव – अपक्ष (शिवसेना शिंदे पुरस्कृत) 
* बोरसर – कल्याण गायके – शिवसेना (उबाठा) 
* शिवूर – संजय निकम – शिवसेना (उबाठा) 
* सवंदगाव – निताताई राजपूत – शिवसेना (शिंदे) 
* लासूरगाव – संगीता तांबे – शिवसेना (शिंदे) 
* घायगाव – श्रीराम गायकवाड – शिवसेना (शिंदे) 
* वांजरगाव – पंकज ठोंबरे – राष्ट्रवादी काँग्रेस
* महालगाव – अविनाश गलांडे – भाजप 

कन्नड तालुका (8) 

* नागद – तृप्ती राजपूत – काँग्रेस 
* करंजखेडा – अर्जुन पाटील – राष्ट्रवादी काँग्रेस 
* चिंचोली लिंबाजी – रावसाहेब पवार – शिवसेना (शिंदे) 
* पिशोर – केतन काजे – शिवसेना (उबाठा) 
* कुंजखेडा – सुनंदा चव्हाण – शिवसेना (उबाठा) 
* हतनूर – मीनाक्षी पवार – भाजप 
* जेहूर – मंजुषा मलदोडे – भाजप 
* देवगाव रंगारी – डॉ. संजय गव्हाणे – भाजप 

खुलताबाद तालुका (3) 

* बाजारसावंगी – प्रतीक्षा कापसे – भाजप 
* गदाना – रेखा चव्हाण – भाजप 
* वेरूळ – कुणाल दांडगे – भाजप 

फुलंब्री तालुका (4) 

* बाबरा – जितेंद्र जयस्वाल – भाजप 
* वडोद बाजार – गोपाळ वाघ – भाजप 
* पाल – गीतांजली पाथ्रीकर – राष्ट्रवादी काँग्रेस (शप गट) 
* गणोरी – निखिल चव्हाण – भाजप 

सिल्लोड तालुका (9) 

* अजिंठा – आयेशाबेगम सय्यद नासेरहुसेन – शिवसेना (शिंदे) 
* शिवना – निकिता काळे – शिवसेना (शिंदे) 
* उंडणगाव – सचिन वाघ – भाजप 
* अंभई – आमेर अब्दुल सत्तार – शिवसेना (शिंदे) 
* घाटनांद्रा – आशा गाढे – शिवसेना (शिंदे) 
* डोंगरगाव – देविदास पालोदकर – शिवसेना (शिंदे) 
* भराडी – राधाकृष्ण काकडे – भाजप 
* अंधारी – मंगल तायडे – शिवसेना (शिंदे) 
* केन्हाळा – अनिता मोठे – भाजप 

सोयगाव तालुका (3) 

* फर्दापूर – मुलतानी माहिन इद्रिस – भाजप 
* आमखेडा – पुष्पाबाई काळे – भाजप 
* गोंदेगाव – सुनीता चव्हाण – शिवसेना (उबाठा)


सम्बन्धित सामग्री