Thursday, March 12, 2026 10:53:16 PM

Maharashtra ZP Election Results 2026 : जिल्हा परिषदेत घराणेशाही! मातब्बर नेत्यांच्या मुलांचा तर कुठे पत्नीचा विजय...जाणून घ्या सविस्तरपणे

पुणे, सोलापूर, रायगड आणि रत्नागिरी या जिल्ह्यांमध्ये दिग्गजांच्या वारसांनी बाजी मारली आहे.

maharashtra zp election results 2026  जिल्हा परिषदेत घराणेशाही मातब्बर नेत्यांच्या मुलांचा तर कुठे पत्नीचा विजयजाणून घ्या सविस्तरपणे

 राज्यातील 12 जिल्हा परिषदा आणि 125 पंचायत समित्यांचे सार्वत्रिक निवडणुकीचे निकाल जाहीर होत आहेत. या निवडणुकीत प्रस्थापित नेत्यांच्या नातेवाईकांनी मोठ्या प्रमाणावर विजय मिळवत आपले राजकीय वर्चस्व सिद्ध केले आहे. पुणे, सोलापूर, रायगड आणि रत्नागिरी या जिल्ह्यांमध्ये दिग्गजांच्या वारसांनी बाजी मारली आहे. पुणे, सोलापूर, परभणी आणि रत्नागिरी या जिल्ह्यात सत्ताधारी महायुती आणि विरोधी महाविकास आघाडी यांच्यात अटीतटीची लढत पाहायला मिळाली.

रत्नागिरी जिल्ह्यात मातब्बर नेत्यांच्या लेकांचा विजय 
रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर विधानसभा मतदारसंघातील असगोली जिल्हा परिषद गटात आमदार भास्कर जाधव यांचे पुत्र विक्रांत जाधव यांनी पहिल्या फेरीपासूनच 571 मतांची आघाडी घेत विजयाकडे कूच केली. तर रायगडमध्ये आमदार भरत गोगावले यांचे चिरंजीव विकास गोगावले यांनीही प्रतिस्पर्ध्याला धूळ चारत विजय मिळवला आहे.

हेही वाचा - Kolhapur ZP Panchayat Samiti Result 2026: कोल्हापुरात सतेज पाटलांचा करिष्मा? 40 जागांचे कल हाती; काँग्रेसने मारली मोठी मुसंडी, वाचा संपूर्ण निकाल 

सोलापूरमध्येही राखली शान 
सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील मानेगाव जिल्हा परिषद गटाकडे सर्वांचे लक्ष लागले होते. येथे माजी मंत्री तानाजी सावंत यांचे पुतणे आणि शिवाजीराव सावंत यांचे पुत्र पृथ्वीराज सावंत यांनी भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवली होती. पृथ्वीराज सावंत यांनी 6 हजार 800 मतांच्या विक्रमी मताधिक्याने प्रतिस्पर्ध्याचा पराभव करत दणदणीत विजय मिळवला.

हेही वाचा - Pune Mayor : पुण्याचा कारभारी ठरला! भाजपच्या मंजुषा नागपुरे बिनविरोध महापौर, तर उपमहापौरपदी परशुराम वाडेकर 

 राम सातपुतेंच्या पत्नीचा विजय
तसेच, सोलापूर जिल्ह्यातच भाजपचे नेते राम सातपुते यांच्या पत्नी संस्कृती सातपुते यांनीही जिल्हा परिषद निवडणुकीत विजय मिळवत राजकीय क्षेत्रात यशस्वी पदार्पण केले आहे.


सम्बन्धित सामग्री