Tue. Sep 28th, 2021

महाराष्ट्रात टाळेबंदी शिथिल! पाहा काय सुरू,काय बंद राहणार!

राज्यात कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे लागू करण्यात आलेले निर्बंध हटवण्यावरून झालेल्या मोठ्या गोंधळानंतर राज्य सरकारने निर्बंध शिथिल करण्याचे आदेश जारी केले आहेत. राज्यात सोमवारपासून ५ टप्प्यांमध्ये निर्बंध शिथिलकरण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. करोना पॉझिटिव्हिटी दर आणि ऑक्सिजन खाटांची उपलब्धता या आधारावरच आता निर्बंध शिथील करण्यात येणार आहेत. त्यासाठी एकूण पाच स्तर निश्चित करण्यात आले आहेत.

पाच टप्पे कोणते ?

पहिला टप्पा: या टप्प्यात औरंगाबाद, भंडारा, बुलढाणा ,चंद्रपूर, धुळे, गडचिरोली, गोंदिया जळगाव, जालना, लातूर, नागरपूर, नांदेड, नाशिक, परभणी,ठाणे,वर्धा, वाशिम, यवतमाळ या जिल्ह्यांचा समावेश आहे.

या टप्प्यातील जिल्ह्यांमध्ये उपहारगृह,मॉल्स,उद्याने, वॉकिंग ट्रेक सुरू होतील, खाजगी, सरकारी कार्यालये १०० टक्के सुरू होतील,सिनेमागृहे सुरू होतील, चित्रपट चित्रीकरणाला परवानगी, सार्वजनिक कार्यक्रम, लग्न सोहळा यांना १०० टक्के सूट दिली आहे. पहिल्या टप्प्यातील जिल्ह्यामध्ये आता जमावबंदी राहणार नाही. व्यायामशाळा, केशकर्तनालये सुरू राहणार आहेत. बससेवा १०० टक्के क्षमतेने सुरु होतील.

दुसऱ्या टप्पा: या टप्प्यात मुंबई, मुंबई उपनगर, अहमदनगर, अमरावती, हिंगोली, नंदुरबार ह्या जिल्ह्यांचा समावेश आहे.

या टप्प्यातील जिल्ह्यांमध्येहाॅटेल,माॅल चित्रपटगृह ५० टक्के क्षमतेने सुरू राहणार आहेत.
सार्वाजिनक जागा, खुली मैदाने , मार्निंग वाॅक सुरू राहील. शासकीय आणि खासगी कार्यालये खुली राहणार आहेत. चित्रपट चित्रीकरण सुरू राहील.
सामाजिक सांस्कृतिक कार्यक्रम ५० टक्के क्षमतेने परवानगी, लग्न सोहळा ५० टक्के आणि जास्तीत १०० लोक उपस्थितीत करण्यास परवानगी आहे. मिटींग आणि निवडणूक ५० टक्के उपस्थितीत करण्यास परवानगी. जीम, सलुन, ब्युटी पार्लर, स्पा ५० टक्के क्षमतेने सुरू होतील. शासकीय बससेवा १०० टक्के क्षमतेने सुरू राहील.

तिसरा टप्पा: या टप्प्यामध्ये अकोला, बीड, कोल्हापूर, उस्मानाबाद, रत्नागिरी, सांगली, सातारा,सिंधुदुर्ग या जिल्ह्यांचा समावेश आहे.

तिसऱ्या टप्प्यात काय सुरु राहील?
अत्यावश्यक दुकाने सकाळी ७ ते २ आणि इतर दुकाने सोमवार ते शुक्रवार सकाळी ७ ते २ सर्व खुले राहतील,, माॅल्स सिनेमागृह बंद राहतील.
उपाहारगृहे ५० टक्के क्षमतेने खुले राहतील तसेच त्यानंतर पार्सलसेवा सुरु असेल. लोकल रेल्वे बंदच राहतील. मॉर्निंक वाॅक, मैदाने , सायकलिंग पहाटे ५ ते सकाळी ९ पर्यंत मुभा असेल, ५० टक्के खासगी आणि शासकीय कार्यालय सुरू राहतील. स्टुडिओमध्ये चित्रीकरण सोमवार ते शनिवार करता येईल. मनोरंजन कार्यक्रम ५० टक्के दुपारी २ पर्संत खुले असणार. लग्नसोहळ्याला ५० टक्के क्षमतेने, तर अंत्यविधीसाठी २० लोकांना मुभा असेल. बांधकामासाठी दुपारी दोन पर्यंत मुभा असेल. जमावबंदी कायम राहील.

चौथा टप्पा: या टप्प्यात पुणे आणि रायगड या दोन जिल्ह्यांचा समावेश आहे.

या जिल्ह्यांमध्ये अत्यावश्यक सेवा २ वाजेपर्यंत सुरु राहणार असून सरकारी आणि खासगी कार्यालयात २५ टक्के उपस्थिती राहणार आहे.
सांस्कृतिक आणि सामाजिक कार्यक्रमांना परवानगी नाही. लग्न सभारंभाला २५ लोकांची उपस्थिती ठेवता येणार.अंत्ययात्रेला २० लोकांच्या उपस्थितीस परवानगी. बांधकामासाठी फक्त ऑनसाईट कामगार काम करणार. शेतीची कामं २ वाजेपर्यंत करता येणार, ई कॉमर्स फक्त अत्यावश्यक सेवेसाठी उपलब्ध, सलून, जिम ५० टक्के क्षमता सुरु राहणार, बससेवा ५० टक्के क्षमतेने चालू राहणार

पाचवा टप्पा: रेड झोन

पॉझिटीव्हिटी दर 20 टक्क्यांपेक्षा अधिक असेल तर तुमचा जिल्हा रेड झोनमध्ये म्हणजेच पाचव्या टप्प्यात येईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *