तुरुंगात कैद्यांना मिळणार चिकन ते मिठाई

तुरुंगांमध्ये आता कैद्यांना चिकन, मटणपासून ते मिठाई, ड्रायफ्रूट्स आणि श्रीखंडापर्यंत अनेक प्रकारचे मिष्टान्न खायला मिळणार आहेत. महाराष्ट्राचे अतिरिक्त महासंचालक सुनील रामानंद यांनी यासंदर्भात पुण्यात घेतलेल्या पत्रकार परिषदेत माहिती दिली आहे.
तुरुंगातील कैद्यांसाठीच्या कँटिनमध्ये मिळणाऱ्या मूलभूत गरजेच्या वस्तूंसोबतच इतर अनेक वस्तूंची वाढ करण्यात आली आहे. अशा एकूण ३० गोष्टी या कँटीनमध्ये मिळणार असून त्याची यादीच महासंचालकांनी जाहीर केली आहे.
फरसाण सरबत शंकरपाळी एनर्जी बार
मिठाई हवाबंद मांसाहारी पदार्थ चकली ग्लुकॉन डी
बेकरीचे पदार्थ कचोरी करंजी अंघोळीचे साबण
ड्राय फ्रुट्स चिकन श्रीखंड अगरबत्ती
सीझनल फ्रुट्स मासे आम्रखंड बूट पोलिश
दही शिरा शेव ग्रीटिंग कार्ड
पनीर लाडू पापडी मिक्स व्हेज
लस्सी चिवडा लोणचे अंडा करी
सामोसा जिलेबी पेढे वडा पाव
च्यवनप्राश चहा कॉफी कॉर्नफ्लेक्स
म्हैसूरपाक फेस वॉश टर्मरिक क्रीम बोर्नव्हिटा
चॉकलेट उकडलेली अंडी पनीर मसाला पुरणपोळी
आवळा कॅण्डी मुरांबा गुलाबजामून
आंबा पेरू बदाम शेक ताक
दूध गूळ गाईचे शुद्ध तूप खिचडी
डिंक लाडू बेसन लाडू आले पाक बटाटा भजी