Thu. Sep 16th, 2021

राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये टाळेबंदीचे निर्बंध शिथील

महाराष्ट्रात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेले टाळेबंदीचे निर्बंध शिथील करण्यात येतील, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी कोव्हिड टास्क फोर्सची बैठक आयोजित करण्यात आली होती.

कोव्हिड टास्क फोर्ससोबतच्या बैठकीत झालेल्या चर्चेची माहिती राजेश टोपे यांनी माध्यमांना दिली. कोरोना रुग्णांची राज्याची जी सरासरी आहे, त्यापेक्षा कमी सरासरी असणाऱ्या २५ जिल्ह्यांतील निर्बंध पूर्णपणे शिथील करण्याचं निश्चित झालेलं आहे.

काही जिल्ह्यांमध्ये कोरोनाची आकडेवारी कमी आहे. ५० टक्के कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत कार्यालये सुरु करता येतील,पण एसीचा वापर नसावा. तसेच रेस्टॉरंट, सलून, पार्लर हळूहळू जास्त संख्येने सुरु करता येतील. आता शनिवारी संध्याकाळीसुद्धा सर्व व्यवहार सुरु ठेवता येऊ शकतील.

 

कोणत्या जिल्ह्यात निर्बंध शिथिल?

मराठवाडा-

परभणी, लातूर, जालना, नांदेड, हिंगोली, औरंगाबाद, उस्मानाबाद

विदर्भ-

अमरावती, गडचिरोली, गोंदिया, चंद्रपूर, नागपूर, बुलढाणा, भंडारा, यवतमाळ, वर्धा, वाशीम

कोकण-

रायगड, ठाणे, मुंबई

उत्तर महाराष्ट्र-

जळगाव, धुळे, नंदुरबार, नाशिक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *