Sun. Jan 16th, 2022

‘चरख्या’ची प्रतिकृती असणारा पूल महाराष्ट्रात होणार

नागपूर-मुंबई महामार्गावर वर्धा जिल्ह्यात गांधीजींच्या चरख्याची प्रतिकृती असलेल्या पुलाची निर्मिती केली जाणार

काही दिवसांपासून नदीवरील असलेल्या पुलाचे चरख्याची प्रतिकृती असलेले फोटो सोशल माध्यमांवर व्हायरल होत आहे.
महात्मा गांधी आणि त्यांच्या चरख्याने वर्ध्याला जागतिक पातळीवर ओळख निर्माण करून दिली. त्यामुळेच चरख्याची प्रतिकृती असलेल्या पुलाची निर्मिती करण्यात येणार आहे. 

नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गाचे नामकरण हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे असे करण्यात आलेले आहे. रस्ते विकास महामंडळाच्या वतीने या महामार्गाचे काम होणार आहे. हा पूल  नागपूर ते मुंबई 700 किलोमीटरचे अंतर 14 तासांऐवजी केवळ 8 होणार आहे.

चरख्याची प्रतिकृती असलेल्या पुलाच्या आराखड्यात  दोन मोठे गोल रिंग (40 मीटर) असतील आणि मध्ये एक रिंग (16 मीटर) असल्याची माहिती आहे. हा पूल वर्धा आणि अमरावती जिल्ह्याच्या सीमेवर म्हणजेच वर्धा नदीला जोडण्याचे काम करणार आहे. 

नागपूर-मुंबई महामार्गावर असे एकूण 32 पूल बांधले जाणार आहेत. यात गांधी जिल्ह्याची ओळख म्हणून चरख्याची प्रतिकृती असणार आहे. चरख्याची प्रतिकृतीमुळे  पूल आकर्षक दिसेल यामुळे दोन्ही बाजूच्या प्रवाशांचे लक्ष याकडे वेधले जाईल. लवकरच या पुलाचे काम सुरू असल्याची माहिती सुत्रांकडून मिळाली आहे. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *