Jaimaharashtra news

राज्यभरात पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस

बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाला असल्याने २१ आणि २२ जुलै रोजी महाराष्ट्रात सर्वत्र पावसाचा अंदाज देण्यात आला आहे. कोकणात पावसाचा जोर पुढील पाच दिवस कायम राहणार असून मध्य महाराष्ट्रासह विदर्भातही पुढील ३ ते ४ दिवस हवामान विभागाकडून पावसाचा अंदाज देण्यात आला आहे.

मुंबई, ठाणे, पालघरमध्ये पुढील ३ दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडणार आहे. आज पुन्हा जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. पुढील 3 दिवस मुंबई, ठाणे, पालघरमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तसेच रायगड, रत्नागिरी, पुणे, सातारा आणि कोल्हापुरला रेड अलर्ट ​पुणे, साताऱ्यातील घाट परिसरात अतिवृष्टीची शक्यता आहे.

महाराष्ट्र आणि कर्नाटक किनारपट्टीला समांतर कमी दाबाचा पट्टा सक्रिय असून तो पुढील तीन दिवस कायम राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे कोकण, घाटमाथ्यावर जोरदार पावसाची शक्यता आहे. विदर्भात विजांसह पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे.

मुंबईत गेल्या दोन दिवसांतजलसाठ्यात वाढ झाली आहे. तर 7 तलावांमधील पाण्याची पातळी वाढली आहे. या तलावात दीड लाख दशलक्ष लिटर पाणीसाठा झाला आहे.

Exit mobile version